हीत ती वेळ… महाराष्ट्रात “भगव्या”चं राज्य येतंय, सरनाईकांच्या पत्रानंतर नितेश राणेंचं ट्विट

हीत ती वेळ… महाराष्ट्रात “भगव्या”चं राज्य येतंय, सरनाईकांच्या पत्रानंतर नितेश राणेंचं ट्विट

हीत ती वेळ... महाराष्ट्रात "भगव्या"चं राज्य येतंय, सरनाईकांच्या पत्रानंतर नितेश राणेंचं ट्विट

शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २ पानी पत्र लिहले आहे. या पत्रातून सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्याची मागणी केली आहे. तसेच महाविकास आघाडीमधील नेते आणि आमदार, खासदार, अधिकारी हे आपल्यावर तपास यंत्रणेचा ससेमिरा लागू नये यासाठी केंद्रातील सत्ताधारी पक्षातील लोकांशी हातमिळवणी करत आहेत. अशा पत्रानंतर हीच ती वेळ महाराष्ट्रात भगव्याचं राज्य येतंय असे सूचक ट्विट भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. सरनाईक यांच्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार याकडं साऱ्यांचं लक्ष लागले आहे.

राज्यात भाजपशी युती तुटल्यावर शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांसोबत सत्ता स्थापन केली आहे. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर तपास यंत्रणेचा ससेमिरा लागला आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर ई़डीची कारवाई सुरु आहे. तर रविंद्र वायकर आणि अनिल परब यांच्यावरही तपास यंत्रणा चौकशी करत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते फोडत असून शिवसेनेला कमकुवत करण्यात येत असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हीच ती वेळ…

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी प्रातप सरनाईक यांच्या पत्रानंतर सूचक ट्विट केलं आहे. प्रताप सरनाईक यांनी पत्रातून भाजपशी जुळवून घेण्याची मागणी केली आहे. यामुळे हीच ती वेळ.. महाराष्ट्रात भगव्याचं राज्य येतंय अस नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप आणि शिवसेनेच्या एकत्र येण्याच्या मागणीवर नितेश राणे आनंदीच असल्याचे दिसते आहे.

शिवप्रसाद काय असतो वैभव नाईकांना विचारा

आमदार नितेश राणे यांनी शिवप्रसाद काय असतो हे वैभव नाईकांना विचारा असा सल्ला शिवेसना नेते संजय राऊत यांना दिला आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी भाजपच्या सदस्यांनी ओळखपत्र दाखवल्यास मोफत पेट्रोल देणार असल्याचा बोर्ड लावला होता. यावेळी पेट्रोल पंपावर मोठा राडा झाला होता. शिवसेनाभवनासमोर झालेल्या राड्याचा बदला भाजपने कोकणात घेतला आहे. यावरुन नितेश राणेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे. “शिव प्रसाद काय असतो, ते संजय राऊतांनी..आमदार वैभव नाईकना विचारावा पोटभर दिला आज आमच्या कार्यकर्त्यांनी..पाहिजे असेल तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिस मधे ..टेस्ट आवडेल नक्की” असं टोला नितेश राणे यांनी केली आहे.

First Published on: June 20, 2021 3:16 PM
Exit mobile version