पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींची तब्येत बिघडली

पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींची तब्येत बिघडली

नवी दिल्लीः केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींची पश्चिम बंगालमधील सिलिगुडीतील एका कार्यक्रमादरम्यान अचानक तब्येत बिघडली. नितीन गडकरी सिलिगुडीमध्ये एका रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात पोहोचले होते, कार्यक्रमातील एका मंचाजवळील खोलीत चहा पित असतानाच अचानक त्यांची तब्येत बिघडली. नेओटिया रुग्णालयाचे प्रसिद्ध डॉक्टर पीबी भुटिया यांच्या देखरेखीखाली नितीन गडकरींना ठेवण्यात आले आहे.

आता गडकरींची तब्येत कशी?
सिलिगुडीच्या माटिगारामधील भाजपचे खासदार राजू बिस्टा यांच्या घरी तीन डॉक्टरांची टीम नितीन गडकरींवर उपचार करीत आहेत. तसेच आता नितीन गडकरींची तब्येत ठीक आहे. त्यामुळे लवकरच त्यांना दिल्लीला हलवण्यात येणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीसुद्धा नितीन गडकरींच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. ममता बॅनर्जींनी सिलिगुडी कमिश्नरना त्यांच्या तब्येतीसाठी सर्व व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

आधीसुद्धा गडकरींची बिघडली होती तब्येत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आधीसुद्धा अनेक कार्यक्रमांमध्ये तब्येत बिघडली होती, सप्टेंबर 2018ला महाराष्ट्रातील अहमदनगरच्या एका कार्यक्रमादरम्यान बेशुद्ध झाले होते. त्याशिवाय नितीन गडकरी एप्रिल 2010 मध्ये दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान जंतर मंतरवर चक्कर येऊन पडले होते. नितीन गडकरींना डायबिटीज आहे. तसेच वजन कमी करण्याचीही त्यांनी शस्रक्रिया केली आहे. सप्टेंबर 2011 मध्ये मुंबईच्या एका रुग्णालयात नितीन गडकरींनी वजन कमी करणे आणि डायबिटीज नियंत्रणात ठेवण्याची बेरिएट्रिक सर्जरी केली होती. खरं तर वजन कमी करण्यासाठी बेरिएट्रिक सर्जरी केली जाते.


हेही वाचाः बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडल्याप्रकरणी शिंदे गटाने दाखल केली तक्रार

First Published on: November 17, 2022 4:24 PM
Exit mobile version