साईंच्या दर्शनानंतर गडकरी नागपुरला होणार रवाना

साईंच्या दर्शनानंतर गडकरी नागपुरला होणार रवाना

सौजन्य- ANI

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात दीक्षांत समारंभात दीक्षांत भाषण देणारे केंद्रिय परिवहन व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रगीताच्या वेळी अचानक भोवळ आली. दरम्यान शेजारीच असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वत: गडकरी यांना सावरले.या घटनेमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी थोडा गोंधळ निर्माण झाला. दरम्यान थोड्याच वेळात गडकरी यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना दुपारी १.४५ च्या सुमारास हेलिकॉप्टरने गडकरी यांना शिर्डी येथे नेण्यात आले. त्यानंतर शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर एका विशेष विमानाने गडकरी यांना नागपूर येथे नेण्यात येणार आहे. नितीन गडकरी शुक्रवारी सकाळी विमानाने शिर्डी येथे व त्यानंतर हेलिकॉप्टरने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आले होते. विद्यापीठाच्या 33 व्या दीक्षांत समारंभात गडकरी यांचे प्रमुख दीक्षांत भाषण होते. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या सहीत अनेक मान्यवर या समारंभासाठी उपस्थित होते.

 


संपूर्ण कार्यक्रम पार पडल्यानंतर राष्ट्रगीत सुरू असतांनाच गडकरी यांना अस्वस्थ वाटू लागले व काही क्षणातच ते खाली कोसळू लागल्याचे दिसताच शेजारीच असलेल्या विद्यासागर राव यांनी स्वत: त्यांना आधार देऊन सावरले व खुर्चीवर बसविले.यांनी कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे असलेल्या गडकरी यांना कार्यक्रमात भोवळ आल्याने मोठी खळ बळ उडाली.त्यानंतर तातडीने गडकरी यांना रूग्णालयात नेण्यात आले.त्यावेळी मधुमेह असणा-या गडकरी यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना भवळ आल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर थोड्या वेळाने गडकरी यांनी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये राज्यपालांच्या समवेत भोजन घेतले.

First Published on: December 7, 2018 4:24 PM
Exit mobile version