संपूर्ण वीजपुरवठा सुरळीत करण्यास २ दिवस लागणार, विरोधी पक्षाने राजकारण करु नये – नितीन राऊत

संपूर्ण वीजपुरवठा सुरळीत करण्यास २ दिवस लागणार, विरोधी पक्षाने राजकारण करु नये – नितीन राऊत

तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यामध्ये वीज पुरवठा खंडीत झालेल्या भागात वीज पुर्ववत करण्यासाठी विद्युत पुरवठा विभागाकडून दिवसरात्र काम करण्यात आले. काही ठीकाणचा वीज पुरवठा सुळीत केला असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. तौत्के चक्रीवादळामध्ये वीजेचे खांब कोलमडून पडले होते. वीजांच्या तारा तुटल्या होत्या त्यामुळे अनेक भागात तसेच ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. हा विद्युत पुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे. तरी अजून २ दिवस संपुर्ण वीज सुरळीत होण्यासाठी लागतील अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेत्यांनी चक्रीवादळाचे राजकारण करु नये असेही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी चक्रीवादळाबाबत राजकारण करु नये असे सांगितले आहे. तर केंद्र सरकार सगळेच त्यांच्या अंतर्गत घेत असतील तर महाराष्ट्र केंद्राकडेच बोट दाखवणार असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. तौत्के चक्रीवादळाचा कोल्हापूर, रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, मुंबई, पालघर या भागाला मोठा तडाखा बसला आहे. या जिल्हांतील वीज पुरवठा खंडीत झाला होता. वीजेचे खांब कोलमडून गेले होते, वायर तुटल्या होत्या यामुळे वीज पुरवठा तातडीने पुर्ववत करण्यासाठी जास्त कामागारांची गरज होती यासाठी नाशिक, नांदेड, कोल्हापूर,नगर मधून कमागारांना बोलावण्या आले होते. युद्धपातळीवर काम करुन वीज पुरवठा पुर्वत करण्यात आला असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले.

तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वॉर रुम स्थापित करण्यात आले होते. तसेच मोबाईलवर महावितरणचे ग्रुप तयार करण्यात आले होते. या माध्यमातून सर्व ठिकाणची माहिती घेण्यात आली होती. यानंतर सर्व ठिकाणी तात्काळ काम सुरु करुन वीज पुरवठा पुर्वत केला आहेत. वादळामुळे कोयना प्रकल्पातील वीज खंडीत झाली होती. रात्रीच्या वेळी स्पॉट लाईटच्या सहाय्याने कोयना प्रकल्प चालु केला असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणचे अभियंते आणि कामगार, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

मागील ३ ते ४ वर्षांपासून राज्यात वादळ येत आहे. त्यामुळे वादळांच्या पार्श्वभूमीवर महावितरण तयार राहणार आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्र महावितरणमध्ये तयार करण्यात येणार आहे. अरबी समुद्रात दरवर्षी वादळ तयार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत.

विरोधी पक्षनेत्यांनी राजकारण करु नये

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करु नये अशी चक्रीवादळाच्या वेळी किंवा कोरोनाच्या वेळीला राजकारण करु नये. हा राजाकारणाचा भाग नाही आहे. गुजरात सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे असे मला वाटत नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. परंतु पंतप्रधान मोदी गुजरातचे आहेत. गुजरातमध्ये मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे तेथे मदत करावी परंतु महाराष्ट्रालाही मदत द्यायला हवी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असे सांगायला पाहिजे होते की, मी गुजरातला मदत करतो आहे तुम्ही महाराष्ट्रातील प्रस्ताव पाठवा जी काही मदत असेल ती पुरवू असे घडले नाही नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकार सगळे अधिकारात घेत आहे

नैसर्गिक आपत्तीमध्ये जर केंद्र सरकार स्वतःच्या अधिकारामध्ये सगळे घेत असेल तर मग महाराष्ट्र केंद्राकडे बोट दाखवणार आहे. कोरोना काळात औषध पुरवठा, वैद्यकीय उपकरणे सर्व केंद्र सरकारने स्वतःच्या अधिकारामध्ये घेतल्यास राज्य सरकार केंद्राकडे मागणारच त्यामुळे केंद्र सरकारकडे मागणी केली जाते. म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन आता केंद्र सरकारने स्वतःच्या अधिकाराखाली घेतले आहेत यामुळे राज्य सरकारला इंजेक्शन मिळत नाही आहेत. यामुळे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे मागणी करणार यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी राजकारण करु नये असेही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

First Published on: May 20, 2021 12:49 PM
Exit mobile version