नाशकात लगेचच लॉकडाऊन नाही; बेड्स साठी कॉल सेंटर सुरु करणार

नाशकात लगेचच लॉकडाऊन नाही; बेड्स साठी कॉल सेंटर सुरु करणार

..तर ३ दिवसांत महाराष्ट्रातील लसीकरण बंद पडेल - आरोग्यमंत्री

नाशिक- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना आता बेड मिळणेही मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शासनाच्या वतीने कॉल सेंटर सुरु करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. नाशिक शहरात लगेचच लॉकडाऊन करणार नाही असे स्पष्ट करतानाच भविष्यात गरज पडल्यास लॉकडाऊनचा विचार होईल असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनाची शुक्रवारी (दि. २४) बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले की, नाशिकमध्ये सहजपणे बेड उपलब्ध होण्यासाठी कॉल सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या माध्यमातून सामान्य लोकांना संपर्क क्रमांकावर किंवा वर्तमानपत्राव्दारे उपलब्ध बेडविषयी माहिती मिळू शकेल. त्याच प्रमाणे डेथ ऑडिट कमिटीचीही स्थापना करण्यात आली आहे.

राजेश टोपे यांनी सांगितलेले महत्वाचे मुद्दे

First Published on: July 24, 2020 5:49 PM
Exit mobile version