राज्यात यापुढे एमब्युलन्सची चिंता नाही!; एका क्लीकवर माहिती मिळणार

राज्यात यापुढे एमब्युलन्सची चिंता नाही!; एका क्लीकवर माहिती मिळणार

मुंबईत कोरोना माहामारीनंतर तासनतास निव्वळ रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने झालेले मृत्यू आणि निष्पाप लोकांचे गेलेले बळी या मुंबईच्या अत्यंत ज्वलंत विषयावर मुंबई हायकोर्टात भाजप उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी आता पूर्ण झाली असून यापुढे मुंबईकरांनाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनतेला आपल्या आसपासच्या रुग्णसेवेची माहिती एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे. सोमैया यांनी केलेल्या याचिकेनंतर हायकोर्टाने दिलेले निर्देश राज्य सरकारकडून पाळण्यात आले आहेत. रुग्णवाहिकेची माहिती आणि रुग्णवाहिकेचे प्रत्येक जिल्ह्यातील दरही आता आरटीओच्या वेबसाईटवर उपलब्ध झाले आहेत. सोमैया यांनी योग्य वेळी योग्य विषयासंदर्भात याचिका दाखल केल्याने न्यायाधीशांनीही सोमैया यांचे कौतुक केले आहे.

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले असून सध्या मुंबईत ७८० नोंदणीकृत रुग्णवाहिकांपैकी ७०० रुग्णवाहिका कार्यरत असल्याचे बीएमसीचे वकील अनिल साखरे यांनी सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. हायकोर्टाने राज्याला दिलेली आणि अधोरेखित केलेली निवेदने रेकॉर्ड करुन स्वीकारली आहेत. राज्य सरकारने रुग्णवाहिकांची गरज असलेल्या रुग्णांवर प्रभावी उपाययोजना सुरू केल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे भाजपचे उपाध्यक्ष खासदार किरीट सोमया यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी पूर्ण झाली आहे. यापुढे जर कोणत्याही खाजगी रुग्णवाहिका चालकाने जर नकार दिला तर त्यासंदर्भात तक्रारही दाखल करता येणार आहे. सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने हे नमूद केले आहे.


हेही वाचा – कोरोनावर प्रभावी ठरणारं ‘डेक्सामेथासोन’ औषध वापरायला आरोग्य मंत्रालयाची परवानगी


 न्यायालयाने दिलेले निर्देश आणि राज्य सरकारने केलेली अंमलबजावणी पुढीलप्रमाणे

·  आरटीओ वेबसाइटवरील डॅशबोर्ड कार्यरत

·   रुग्णवाहिका माहिती यादी उपलब्ध

·   रुग्णवाहिकेसंदर्भात तक्रार असल्यास संपर्क साधता येणार

·   अधिक माहितीसाठी https://transport.maharashtra.gov.in/Site/Common/ViewPdfList.aspx?Doctype=
First Published on: June 27, 2020 6:50 PM
Exit mobile version