यापुढे रस्त्यांवर वाढदिवस साजरा करण्यास बंदी!

यापुढे रस्त्यांवर वाढदिवस साजरा करण्यास बंदी!

प्रातिनिधिक फोटो

वाढदिवस म्हटलं की अनेक ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर मांडव टाकून ‘भाई का बड्डे’ साजरा केला जातो. परंतु इथून पुढे राजकीय नेत्यांसह युवा कार्यकर्ते,नागरिक यांना रस्त्यांवर वाढदिवस साजरा करता येणार नाहीये. तसंच मित्रांना सोबत घेऊन भर रस्त्यात डिजेवर थिरकता येणार नाही.कारण पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के पदमनाभन यांनी सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यास मज्जाव केला आहे. यासाठी वेळ निश्चीत करण्यात आली असून रात्री १० च्या नंतर वाढदिवस साजरा करता येणार नाही. वाढदिवस साजरा केलाच तर एक वर्षाचा करावासाची शिक्षा बर्थडे बॉयसह मित्रांना होऊ शकते.या कारवाईच सामान्य नागरिकांमधून स्वागत होत असून कौतुक केलं जातं आहे. वाकड पोलिसांनी केलेली अशाप्रकारची ही पहिली कारवाई केली आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशीच बर्थडे बॉयला पोलीस ठाण्यात जावं लागलं होतं.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडेबॉयला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गंगाराम उर्फ संदीप शंकर तांबे याचा वाढदिवस गुरुवारी म्हणजे आज होता.मध्यरात्री मित्रांनी केक आणून काळेवाडी येथील एका शाळेसमोर वाढदिवस साजरा करायला सुरुवात केली. मित्रांनी जल्लोष करत आरडाओरडा केला तेथील एका सजक नागरिकाने वाकड पोलिसांना फोन द्वारे याची माहिती दिली.काही मिनिटात पोलिसांनी तेथे येऊन थेट बर्थडेबॉयसह १३ जणांना ताब्यात घेत बेकायदेशीर जमाव जमवणे तसेच जनतेचा उपद्रव करणे या कलमांअतर्गत गुन्हा दाखल केला आहे.ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांचया मार्गदर्शांखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी केली.या कारवाईचे आणि निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.

नेहमीच गल्लीतील युवा ‘दादा’ ‘भाऊ’ ‘भाई’ हे जमाव जमवून भर रस्त्यात डिजेचा तालावर वाढदिवस साजरा करताना दिवसातात सोबतच तलवारीने केक कापण्याचे फॅड हे तरुणांनमध्ये आहे.याचा नाहक त्रास तेथील नागरिकांना होत होता.वाढदिवसाचा हा माहोल मध्यरात्री पर्यंत चालायचा परंतु आता सार्वजनिक रस्त्यांवर वाढदिवस करण्यास बंदी घातल्याने नागरिक आनंदी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे इथून पुढे रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना थोडं जपून.

First Published on: November 22, 2018 10:15 PM
Exit mobile version