पुणे-नाशिक महामार्गावर कार उलटली

पुणे-नाशिक महामार्गावर कार उलटली

संगमनेर : तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारात कार उलटली. ही घटना मंगळवारी (दि.१) सकाळी घडली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. दैव बल्वतर म्हणून चालक हा बालंबाल बचावला. पोलिसांच्या माहितीनुसार, कार आळेफाट्याकडून संगमनेरच्या दिशेने जात होती.

कार बोटा शिवारात असलेल्या तळपेवाडी येथे आली असता त्यावेळी कार महामार्ग सोडून बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत उलटली. यावेळी कारचे मोठे नुकसान झाले. कार पलटी झाल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर डोळासणे महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूककोंडी फोडत
सुरळीत केली.

First Published on: February 2, 2022 8:55 AM
Exit mobile version