देशी जुगाड : आदिवासी भागात शेळ्यांना रेनकोट

देशी जुगाड : आदिवासी भागात शेळ्यांना रेनकोट

अकोले : पावसाळ्यात थंडी आणि वारा मोठ्या प्रमाणावर पडणारा पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेळ्या मरण पावतात. थंडी आणि पावसापासून बचाव संरक्षण करण्यासाठी आदिवासी शेळीपालकांनी अनोखे देशी जुगाड केले आहे. शेळ्यांच्या पाठीवर खतांच्या मोकळ्या गोण्या धुवून स्वच्छ केल्यानंतर त्यापासून बनवलेले रेनकोट प्रत्येक शेळीला बांधण्यात आले आहेत.

तालुक्यातील आदिवासी पाट्यातील बहुसंख्य ठाकर समाजातील कुटुंब शेळीपालन हा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात. तालुक्यातील पश्चिमेकडील आदिवासी पट्टा असलेल्या अतिदुर्गम घाटघर , उडदावणे, पांजरे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेळी पालक आहेत.

या गोण्यांमुळे शेळ्यांच्या शरीरावर केसांमध्ये पाणी न जाता निथळून ते खाली पडत आहे. परिणामी, शेळ्यांचा जोरदार पाऊस व थंडी, वार्‍यापासून बचाव होत आहे. ही अनोखी शकल लढवणारे ठाकर समाजातील ही गरीब कुटुंब माणसांप्रमाणेच शेळ्यांनाही संरक्षण देताना दिसत आहेत. अकोले तालुक्यात सध्या सर्वत्र रेनकोट घातलेल्या शेळ्यांचे कळप दिसत आहे. त्यामुळे जोरदार पाऊस पडत असूनही, शेळ्यांना चारा खाण्यासाठी जंगलात फिरवता येत आहे. ही अनोळखी शक्कल पाहण्यासाठी शेतकरी व पर्यटक गर्दी करत आहेत.

First Published on: July 13, 2022 1:25 PM
Exit mobile version