उद्योगपती दिग्विजय कापडिया यांचे निधन

उद्योगपती दिग्विजय कापडिया यांचे निधन

शहरातील प्रसिद्ध उद्योगपती तथा नाशिक रिटेल क्लॉथ असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया (वय७६) यांचे रविवारी (दि.४) पहाटेच्या सुमारास निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

महाराष्ट्र चेंबर, रोटरी अशा विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी उद्योग वर्तुळातील विविध प्रश्नांना वाचा फोडली आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. उद्योग, व्यापार सांभाळतानाच ते गेल्या ५० वर्षांपासून ते पंचवटी एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी सदस्य म्हणून कार्यरत होते, तसेच या संस्थेचे माजी अध्यक्ष होते. या संस्थेत बी. फार्मसी आणि डी. फार्मसी सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. नाशिक गुजराथी समाजाचे अध्यक्ष होते.

First Published on: July 4, 2021 10:31 AM
Exit mobile version