दारू दुकानाविरोधात आंदोलन

दारू दुकानाविरोधात आंदोलन

नेवासा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने देशी दारु दुकानांवर छापा टाकत बनावट दारु विक्रीचे रॅकेट उघडकीस आणले होते.बनावट दारू विक्रीतून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारे नेवासा फाट्यावरील कत्तेवार देशी दारु दुकानाचा परवाना रद्द करावे, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी नगर-औरंगाबाद रोडवरील नेवासा फाटा येथे रास्ता रोको केले.

नेवासा फाटा येथील बादल परदेशी व नारायण लष्करे मित्र मंडळाच्या वतीने राजमुद्रा चौकात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शिवसेनेचे राजू काळे, पप्पू परदेशी, सूरज परदेशी, माऊली तोडमल, हिरामण धोत्रे, सुनील धोत्रे यांच्यासह महिलाही सहभागी झाल्या होत्या.बनावट दारुमुळे मद्यपींना जुलाब-उलट्यांचा त्रास झालेला असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने केवळ दिखावू कारवाई केली आहे. यासंदर्भात आंदोलकांनी पोलिसांना निवेदन दिले.

उत्पादन शुल्कचे दुर्लक्ष
रास्ता रोको आंदोलनात महिला-पुरुष सहभागी झाले होते. रवींद्र कत्तेवार यांचा परवाना रद्द करण्याची मागणी होत असताना या रास्ता रोको आंदोलनाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसून आले.

First Published on: November 29, 2021 6:09 PM
Exit mobile version