आज नको उद्या या!- गोवरच्या सर्व्हे आणि लसीकरणात कटू अनुभव

आज नको उद्या या!- गोवरच्या सर्व्हे आणि लसीकरणात कटू अनुभव

ठाणे । गोवर रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने मुंब्रा आणि इतर भागात घरोघरी सर्व्हे सुरू केले. पहिला टप्पा पार केल्यानंतर दुसरा टप्पा पूर्ण करून तिसर्‍या टप्पा हाती घेण्यात येत आहे. मात्र या सर्वेक्षणाला घरोघरी जाणार्‍या पथकाच्या तोंडावर दरवाजा आपटणे, सर्व्हेला विरोध करीत थेट पथकाच्या अंगावर सोसायटी धावून जाते, घरात असतांनाही बाहेरुन कुलुप लावून घरात नाही असे भासवणे, त्या शिवाय आता नको नंतर या ! याशिवाय लसीकरण आज नको उद्या या असे सांगून दुसर्‍या दिवशी घराला टाळे लावून बाहेर निघून जातात. असे काही कडू अनुभव येत आहेत. त्यामुळे गोवर कसा रोखायचा असेल तर सर्व्हे आणि लसीकरण करायचे कसे असाच प्रश्न राहून राहून उपस्थित होत आहे.

मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यात ही गोवरने शिरकाव केला. त्यातच, ठाणे जिल्ह्यातील ठाणे , भिवंडी या भागात मागील काही दिवसापासून गोवरच्या संख्या वाढत आहे. त्याला वेळीच आळा घालण्यासाठी महापालिकेने लसीकरण आणि सर्व्हे करण्यास सुरू केली. मुंब्रा, कौसा, आतकोनेश्वरनगर, शीळ आणि वर्तकनगर या आरोग्य केंद्रावर भर दिला जात आहे. ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला 274 जणांचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील 54 जणांना गोवरची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यातील 36 रुग्ण पार्कींग प्लाझा आणि 14 रुग्णांवर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 0 ते 5 या वयोगटातील 70 टक्के, 6 ते 15 वयोगट – 29 टक्के आणि 15 ते 18 वयोगटातील 1 टक्के रुग्णांचा समावेश आहे. यातील बहुतेकांनी गोवरची लस घेतली नसल्याचेच तपासणीत आढळून आले आहे.

सर्व्हे आणि लसीकरणासाठी शाळा व्यवस्थापनाने देखील यात लक्ष घालण्याचे गरजेचे आहे. त्यानुसार शाळेतील शिक्षकांनी एखाद्या मुलाला ताप आला असेल तर त्याला लागलीच घरी पाठविणो गरजेचे असल्याचे पालिकेने सांगितले. तसेच लसीकरणाबाबत चित्रफीतीच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

लसीकरण आणि सर्व्हेसाठी 160 पथके तयार केले आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व्हेचे टप्पे सुरू आहेत. यामुळे गोवरची साखळी आताच रोखणे त्यामुळे शक्य होणार आहे.
– अभिजित बांगर, आयुक्त, ठामपा

First Published on: November 28, 2022 10:18 PM
Exit mobile version