आता कोल्ड्रिंक्स, कुरकुरे व चिप्सची होम डिलिव्हरी!

आता कोल्ड्रिंक्स, कुरकुरे व चिप्सची होम डिलिव्हरी!

शीतपेय आणि चिप्स सारखे उत्पादन बनवणारी कंपनी पेप्सीको आपल्या प्रॉडक्टची होम डिलिव्हरी करत आहे. कंपनीने होम डिलिव्हरी सर्व्हिससाठी ऑन डिमांड डिलिव्हरी सर्व्हिस देणारी डंजो (Dunzo) सोबत हात मिळविला आहे. कंपनीने याची सुरुवात पायलट प्रोजेक्ट तर्फे बंगळुरूपासून केली. येत्या काही दिवसात दिल्ली, मुंबई आणि जयपूर या शहरात सुरू केले जाईल.

डंजो आपल्या प्लॅटफॉर्मवर अँपमार्फत इ-स्टोरवर कोल्ड्रिंक्स, कुरकुरे आणि चिप्स यासारख्या प्रॉडक्टची लिस्ट असेल. त्यानुसार ग्राहक ऑर्डर देतील. ऑर्डर मिळाल्यावर ग्राहकांना एका तासाच्या आत डिलिव्हरी केली जाईल. पेप्सीको इंडियाचे वरिष्ठ संचालक (मार्केटिंग) दिलन गांधी म्हणाले की, डंजो सोबतची पार्टनरशिप आमच्या ‘डायरेक्टर-टू-कस्टमर’ला आणखी मजबूत बनवेल. आमचे उत्पादन हे ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यास मदत करेल.

डंजोचे सीईओ आणि सह-संस्थापक कबीर बिस्वास यांनी सांगितले की, पेप्सीको इंडिया सोबत ग्राहकांना चांगल्या दर्जाचे प्रॉडक्ट्सची डिलिव्हरी केली जाईल. या आवश्यक उत्पादनाच्या डिलिव्हरीमध्ये अन्न सुरक्षा मानकेचे पालन करू.

First Published on: May 27, 2020 4:21 PM
Exit mobile version