भाजप सरकारवर विश्वास नाही, ओबीसी समाजाची नाराजी

भाजप सरकारवर विश्वास नाही, ओबीसी समाजाची नाराजी

ओबीसी समाजाकडून आंदोलन

एकीकडे राज्यभरातले मराठा बांधव मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर जल्लोष करत असतानाच दुसरीकडे ओबीसी समाजाकडून मात्र तीव्र विरोधाचा सूर आळवला जात आहे. मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही असं स्पश्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सभागृहामध्ये बोलताना सांगितलं असताना देखील विविध ओबीसी संघटनांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे या संघटनांकडून अजूनही नाराजी व्यक्त केली जात असून ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराच या संघटनांकडून दिला जात आहे.

एकमताने मंजूर झाले मराठा आरक्षण

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज (गुरुवारी) सरकारने मराठा आरक्षणासंबंधीचा अॅक्शन टेकन रिपोर्ट अर्थात एटीआर मांडला. राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार आरक्षणासाठीचा एटीआर मांडण्यात आला. त्यानंतर सभागृहातील विरोधक आणि सत्ताधारी अशा दोन्ही बाजूच्या आमदारांनी विरोध न करता एकमताने मराठा आरक्षणाला मंजुरी दिली. त्यामुळे राज्यभरात शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण मंजूर झाले आहे. मात्र, त्यावर आता ओबीसी समाजाकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – उद्धव ठाकरे आझाद मैदानात, आश्वासनानंतर आंदोलन मागे

‘भाजप सरकारवर विश्वास नाही’

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही असं स्पष्ट करून देखील ओबीसी समाजाकडून भारतीय जनता पक्षावर विश्वास नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भातील संपूर्ण विधेयक समोर आल्याशिवाय भाजप सरकारवर विश्वास ठेऊ शकत नाही, अशी भूमिका ओबीसी संघटनांकजून घेतली गेली आहे.

First Published on: November 29, 2018 7:25 PM
Exit mobile version