OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे राज्यभरात जेल भरो आंदोलन

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे राज्यभरात जेल भरो आंदोलन

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे राज्यभरात जेल भरो आंदोलन

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी आज भाजपाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात १ हजार ठिकाणी जेलभरो आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, बीड, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, मुंबईसह अनेक राज्यांमध्ये सध्या भाजपाने चक्का आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबई, नागपूर ठाण्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या या आंदोलनात भापजाचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांसह अनेक भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि ओबीसी नेते रस्त्यावर उतरले आहेत.

भाजपाच्या ओबीसी आरक्षणाच्या राज्यव्यापी आंदोलनाला ठाण्यात सुरु झाली आहे. प्रविण दरेकर यांच्या नेतृत्त्वाखाली ठाण्यात या आंदोनलानाला सुरुवात झाली. यावेळी अनेक भाजपा नेत्यांनी चक्का जाम आंदोलन सहभाग घेतला आहे. कोरोनाचे संकट असतानाही या आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे पोलिसांनी प्रवीण दरेकरांसह आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर ताब्यात घेतले आहे.

तर मुंबईत आशिष शेलार आणि मनोज कोटक यांच्या नेतृत्त्वाखाली मुंलुंड टोलनाक्याजवळ भाजपाने चक्काजाम आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यावेळी आशिष शेलारांसह अनेक भाजपा कार्यकर्त्यांना मुंलुंड टोलनाक्यावरील रस्त्यावरच ठिय्या मांडत ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केल्या, यावेळी पोलिसांनी मुलुंड टोलनाक्यावरून आशिष शेलारांसह अनेक भाजपा कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पुण्यातही भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली तीव्र आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी पुण्यात भाजप आक्रमक झाले असून कात्रज बायपासजवळ पंकजा मुंडे यांचा ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

तर परळीतही प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली ओबीसींच्या मागण्यांसाठी आंदोलन केले जात आहे. या आंदोलमुळे पुणे, परळीतील अनेक रस्त्यांवरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ‘ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.

तर नागपूरातही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली ओबीसी आरक्षणासाठी आंदोनल सुरु आहे. या आंदोलनात चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन सहभागी झाले आहेत. ओबीसी समाजाला राजकारणातून हद्दपार करण्याचा घाट आघाडी सरकारने घातला असल्याचा गंभीर आरोप करीत आज ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षणरद्द झाल्याच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द- आशिष शेलार

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे आज भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक झाली तरी चालेल पण या नाकर्त्या सरकारला जाग यायला हवी. जोवर ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोवर आमची भूमिका अशीच दिवसेंदिवस तीव्र करु, असेही आशिष शेलार म्हणाले.

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालंय- गिरीष महाजन

ओबीसी समाजामध्ये आज प्रचंड रोष आहे. सरकारमध्ये कोणतीही एकवाक्यता नसल्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालंय, असं गिरीष महाजन म्हणाले.

तर वारंवार आंदोलन करु- प्रितम मुंडे

या आंदोलनानंतर सरकारचे डोळे उघडले नाही तर आम्हाला पुन्हा सरकारचे डोळे उघडण्यासाठी वारंवार आंदोलनं करावी लागतील असं खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या.

ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही : पंकजा मुंडे

सरकारने १५ महिने वेळकाढूपणा केला, ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे.

First Published on: June 26, 2021 12:48 PM
Exit mobile version