Coronavirus : गेल्या २४ तासात ३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू!

Coronavirus : गेल्या २४ तासात ३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू!

प्रातिनिधिक छायाचित्र

गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलामध्येही कोरोना व्हायरसचा विळखा वाढत आहे. आज आलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासात महाराष्ट्र पोलिस दलातील ३ कर्मचार्‍यांचा कोरोनामुळेमृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ५४ वर गेली आहे. राज्यामध्ये आतापर्यंत ३२३९ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.  राज्यात अजूनही ९९१ पोलिसांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये काल राज्यात २४ तासामध्ये ३,८९० कोरोनाग्रस्त रुग्ण समोर आले आहेत. तर २०८ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता १,४२,९०० पर्यंत पोहचली आहे. तर ६७३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

First Published on: June 25, 2020 1:51 PM
Exit mobile version