जंजिरा किल्ल्यावर कायम स्वरुपी तिरंगा

जंजिरा किल्ल्यावर कायम स्वरुपी तिरंगा

Janjira Fort

कोकण किनारपट्टीवरील जलदुर्गांपैकी एक असलेल्या अभेद्य जंजिरा किल्ल्यावर आज कायम स्वरुपी तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, आमदार संजय केळकर, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक भोजमगुंडे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने हजर होते.यावेळी ढोलताशांच्या गजरात, भगवे झेंडे फडकवत मिरवणूक काढण्यात आली. जय भवानी, जय शिवाजीचा गजर लाटेच्या गाजासोबत आसमंतात दुमदुमून गेला होता. जंजिरा किल्ल्यावरील वातावरण शिवमय होऊन गेले होते.मुरुड जंजिरा किल्यावर तिरंगा अद्यापही लावण्यात आलेला नव्हता. याबाबत शिवप्रेमींकडून प्रयत्न सुरू होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून पुरातत्व विभागाने जंजिरा किल्यावर तिरंगा फडकविण्यास परवानगी दिली. त्यानुसार आज जंजिरा किल्यावर राष्ट्रध्वज मोठ्या दिमाखात फडकविण्यात आला.

First Published on: October 29, 2018 2:38 AM
Exit mobile version