दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, घरातल्या विहिरीतच आढळला मृतदेह

दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, घरातल्या विहिरीतच आढळला मृतदेह

दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, घरातल्या विहिरीतच आढळला मृतदेह

अपहरण झालेल्या दीड महिन्याच्या बाळाचा मृतदेह घरातल्या विहिरीतच आढळून आल्याची धक्कादायक घटना अमरावती येथे घडली आहे. अमरावतीच्या न्यू प्रभात कॉलनी येथे एका दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, विहिरीत मृत अवस्थेत बाळाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; रविवारी मृत बाळाच्या घरातील काही सदस्य लग्न समारंभात गेले होते. ही संधी साधत अज्ञातांनी बाळाचे अपहरण केले. आपले बाळ गायब झाल्याचे लक्षात येताच कुटुंबातील व्यक्तींनी बाळाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, बाळाचा शोध काही लागला नाही. अखेर कुटुंबातील सदस्यांनी शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली.

कुटुंबियांनी तक्रार दाखल करताच पोलिसांनी तपास सुरु करण्यास सुरुवात केली. याकरता पोलीस पथकाने डॉग स्कॉडची देखील मदत घेतली. मात्र, बाळ न सापडल्याने सर्वजण हैराण झाले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी घराच्या शेजारी असणाऱ्या विहिरीत बाळाचा मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाचे अपहरण आणि मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी काही पुरावा मिळतो का याची चाचपणी केली. यावेळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

दरम्यान, घरातल्या विहिरीतच बाळाचा मृतदेह आढल्याने या प्रकरणाला वेगळंच वळण लागले आहे. पोलिसांनी याविषयी तक्रार नोंदवून घेतली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.


हेही वाचा – राज्यात ३,८३७ नवे रुग्ण; ८० जणांचा मृत्यू


 

First Published on: November 30, 2020 7:35 PM
Exit mobile version