धक्कादायक! चंद्रपुरातही कोरोनाचा शिरकाव; तर राज्यात ३ हजार रुग्ण

धक्कादायक! चंद्रपुरातही कोरोनाचा शिरकाव; तर राज्यात ३ हजार रुग्ण

चंद्रपुरातही कोरोनाचा शिरकाव; तर राज्यात ३ हजार रुग्ण

वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूने आता चंद्रपुरातही शिरकाव केला आहे. आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण चंद्रपुरात सापडला नव्हता. मात्र, चंद्रपुरात पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ८१ वर गेली आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार ८१ वर गेली आहे. तर १६५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर १६५ रुग्णांपैकी १०७ रुग्ण हे मुंबईतील आहेत. आज समोर आलेल्या यादीनुसार चंद्रपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.


हेही वाचा – Lockdown : लॉकडाउनचा कालावधी क्रीडा क्षेत्रासाठी अयोग्य काळ!


 

First Published on: April 16, 2020 1:43 PM
Exit mobile version