मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी तरुणाने केली आत्महत्या

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केली असून आरक्षणासाठी या आठवड्यातील ही चौथी आत्महत्या आहे. प्रमोद होरे पाटील असे या तरुणाचे नाव असून त्याने रविवारी संध्याकाळी ‘आरक्षणासाठी एक मराठा जातोय’ अशी फेसबूक पोस्ट टाकत आत्महत्या केली. ही घटना औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी परिसरात घडली. प्रमोदच्या फेसबूक पोस्टनंतर त्याच्या घरच्यांनी आणि मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. अखेर रविवारी रात्री त्याने रेल्वेखाली उडी मारून जीव दिल्याचे उघड झाले.

आत्महत्या करण्यापूर्वी रेल्वे रुळाजवळ सेल्फी काढून ते फोटो फेसबूकवर टाकले होते.

मित्रांना टॅग करुन टाकली होती पोस्ट

प्रमोद हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तो स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. त्याने रविवारी दुपारी फेसबूकवर एक पोस्ट टाकली होती. ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, “चला आज एक मराठा जातोय…पण काही तरी… मराठा आरक्षणासाठी करा…जय जिजाऊ… आपला प्रमोद पाटील”. ही पोस्ट त्याने रविवारी दुपारी अडीच वाजता टाकली होती. ही पोस्ट टाकताना त्याने आपल्या तीन मित्रांना पोस्ट टॅग केली होती. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी प्रमोदने रेल्वे रुळाजवळ उभा असलेला फोटो फेसबूकवर टाकला आणि त्या फोटोसोबत ‘मराठा आरक्षण जीव जाणार’ असे लिहिले होते. त्याच्या या पोस्टनंतर मित्र यादीतील काही लोकांनी त्याला असे न करण्यास कमेंट्सद्वारे सल्ला दिला होता.

आत्महत्या करण्यापूर्वी फेसबूकवर केली होता पोस्ट

फेसबूक पोस्ट खरी की फोटोशूट ?

प्रमोद होरे पाटील याच्या फेसबूक वॉलवर आत्महत्या करण्याअगोदरच्या या पोस्टी सध्या दिसत नाहीत. त्यामुळे त्या पोस्ट खऱ्या होत्या की, फोटोशॉप याबद्दल पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, प्रमोदने पोस्ट केलेले फेसबूक पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

First Published on: July 30, 2018 5:26 PM
Exit mobile version