शिवसेनेला दणका, माथेरान नगरपरिषदेच्या १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेनेला दणका, माथेरान नगरपरिषदेच्या १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेनेला दणका, माथेरान नगरपरिषदेच्या १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

जळगाव मुक्ताईनगर नगरपालिकेतील भाजपच्या १० आजी-माजी नगरसेवकांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याचा बदला भाजपने अवघ्या १२ तासात घेतला आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील राजकीय उलथापालथीमुळं तेथील वातावरण अचानक तापलं आहे. माथेरान नगरपरिषदेच्या १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भाजपने शिवसेनेला चांगलीच मात दिली असल्याची चर्चा आहे. माथेरान नगरपरिषदेच्या १४ पैकी १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरमध्ये या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जळगाव मुक्ताईनगर नगरपालिकेचे १० आजी-माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

माथेरान नगरपालिकेत एकूण १४ नगरसेवक आहेत. त्यापैकी १४ नगरसेवक शिवसेनेचे होते, त्यातील दहा जणांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात हा प्रवेश सोहळा पार पडला. या पक्षांतरामुळं माथेरान नगरपालिकेत भाजप बहुमतात आला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष/ आरोग्य समिती सभापती), राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रुपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम,ज्योती सोनावळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

जळगावमध्ये भाजपला धक्का

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी या १० नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये ७ विद्यमान नगरसेवक आहेत तर ३ माजी नगरसेवक आहेत. यामुळे भाजपला मोठे खिंडार पडले आहे. यापुर्वी महापौर शिवसेनेचा झाल्यामुळे भाजपला धक्का बसला होता तर आता १० नगरसेवकांनी पक्षप्रवेश केल्यामुळे भाजपलाच हादरा बसला आहे. यापुर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

First Published on: May 27, 2021 2:32 PM
Exit mobile version