भाजपकडून अण्णांची मनधरणी

भाजपकडून अण्णांची मनधरणी

भाजपकडून अण्णांची मनधरणी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरून येत्या ३० जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर अण्णांनी हे आंदोलन करुन नये, यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी सुरु आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धी येथे दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भेट घेत आंदोलन करु नका, अशी मागणी केली आहे. तुमचे सर्व मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवतो, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांना दिला आहे. यावेळी गिरीश महाजन, विखे-पाटील आदी उपस्थित होते.

काय म्हणाले फडणवीस?

‘अण्णांनी येत्या ३० जानेवारीला आंदोलनाचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर त्यांची आज भेट घेण्यात आली. या भेटी दरम्यान, त्यांनी सांगितले की, त्यांच्या काही मागण्या आहेत. त्या मागण्याबाबत त्यांची काही मते आहेत. या सर्व गोष्टी आम्ही केंद्राजवळ मांडणार आहोत. कारण अण्णा हजारे केवळे एक व्यक्ती नाही आहेत. तर या महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व आहे. ते महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यामुळे नेहमी स्वत:साठी नाही तर समाजासाठी नेहमी लढत असतात. त्यामुळे आमची सर्वांचीच अशी एक अपेक्षा आहे की, त्यांचे जे काही विषय आहेत ते मार्गी लागावे. जेणेकरुन त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ नये. तसेच त्यांची जी काही मते आहेत ती केंद्र सरकार पुढे मांडू. यामुळे त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही’.

अण्णांची २३ पत्रे केंद्राकडे पडून

अण्णांनी आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर पत्रे लिहिली आहेत. त्यातील २३ पत्रे ही केंद्राकडे आहेत. त्याबाबत काय झाले?अशी विचारणा केली असता त्याबाबत देखील अण्णांशी बोलेणे झाले असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


हेही – सीरममधील आगीचा लसीकरणावर कोणताही परिणाम नाही – मुख्यमंत्री


 

First Published on: January 22, 2021 7:58 PM
Exit mobile version