देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवारांची भेट

देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवारांची भेट

देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवारांची भेट

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. फडणवीस भेट का घेणार हे अद्याप समोर आलेलं नाही. शरद पवारांच्या प्रकृती संदर्भात विचारपूस करणार असल्याचं समजतंय. शरद पवांरांवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. अनेक नेते त्यांची भेट घेत आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे केवळ प्रकृतीची विचारपूस करायला जाणार आहेत की अन्य कारणांसाठी हे येत्या दिवसात समोर येईलच.

राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत, त्या पाहता देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची भेट खूप महत्त्वाची आहे. देवेंद्र फडणवीस आज किंवा परवा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

कोरोना लसींबाबत केंद्राशी बोला

केंद्र सरकारकडून आवश्यक लसींचा पुरवठा होतो आहे. मात्र कधीकधी लसी कमी पडतात. आजच्या घडीला महाराष्ट्राला सर्वाधिक लसींचा पुरवठा होत आहे. केंद्र सरकारशी चर्चा करुन याबाबत मागणी केली पाहिजे. मीडियात येऊन याबाबत बोलणे योग्य नाही. माध्यमांमध्ये बोलायचं आणि हात झटकायचं हे बंद झालं पाहिजे. विरोधकांना म्हणायचं राजकारण करु नका आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्र्यांनीच राजकारण करायचं हे योग्य नाही, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

 

First Published on: April 7, 2021 5:16 PM
Exit mobile version