राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुख्यमंत्र्याचे पूरस्थितीवर लक्ष

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुख्यमंत्र्याचे पूरस्थितीवर लक्ष

देशभरात मान्सून सक्रिय झाला असून, पावसाने चांगलीच बॅटींग केली आहे. मागील चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्याच्या अनेक भागांच पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता हवामान विभागाने काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच, नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण स्वत: उपस्थित राहून राज्यभरातील पूरस्थितीचा आढावा घेत असल्याचे सांगितले. (orange alert to raigad palghar pune satara kolhapur by imd)

हवामान विभागाच्या माहितीनुसार, रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

देशातील अनेक भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) नदी नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती आहे. तसेच, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात हवामान विभागाकडून आज आणि उद्या दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुण्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोकण रेल्वे मार्गावर मातीचा भराव आल्याने दोन तास वाहतूक ठप्प होती. अंजणी आणि चिपळूण दरम्यान रेल्वेमार्गावर माती आल्यामुळे एक्स्प्रेस खोळंबली होती. कोकण रेल्वेची ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.

“पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी बारकाईने निरीक्षण करत आहे. सर्व अधिकारी माझ्या संपर्कात आहेत. सर्व डीएम मैदानात आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे”, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


हेही वाचा – पुढील चार दिवस समुद्राला उधाण; जाणून घ्या भरतीच्या तारीख व वेळा

First Published on: July 15, 2022 8:32 AM
Exit mobile version