वहिंपकडून ९ डिसेंबरला धर्मसभेचे आयोजन

वहिंपकडून ९ डिसेंबरला धर्मसभेचे आयोजन

धर्म सभेचे आयोजन करताना

शहरात राम मंदिराच्या निर्माणसाठी ९ डिसेंबरला धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. राम मंदिर व्हावे यासाठी देशभरात अनेक ठिकाणी महासभांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने संसदेमध्ये अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी कायदा संमत करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

९ डिसेंबरला ही धर्मसभा बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानात होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला काशीला पीठाधीश्वर मंत्री प्रज्ञा भारती तसेच अतुल शास्त्री भगरे गुरुजी आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हुकुमचंद सावला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे शंकर गायकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे शहरांमध्ये होणार्‍या धर्मसभेला विश्व हिंदू परिषदेच्या देशभरातील प्रमुख पदाधिकार्‍यांची उपस्थिती असणार आहे. अयोध्येचा मुद्दा हा सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्यावर जानेवारी महिन्यात सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, त्याबाबत केंद्र सरकारने संसदेच्या आगामी अधिवेशनात मंदिर उभारण्याचा कायदा पारित करावा. अन्यथा आंदोलन करणार असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. राम मंदिर निर्माण करण्यासाठी या धर्मसभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याचा विश्व हिंदू परिषदेचा प्रयत्न आहे.

First Published on: December 7, 2018 4:24 AM
Exit mobile version