कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद होणार – मुख्यमंत्री

कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद होणार – मुख्यमंत्री

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट असलेल्या २७ पैकी १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत एका निवेदनाद्वारे केली. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून २७ गावांतील नागरिकांना अनेकदा आंदोलने देखील केली होती. अखेर यासंबंधीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केला.

२७ गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याबाबत स्थानिकांकडून मागणी केली होती. त्यानंतर कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातून २७ गावे वगळून नगरपरिषद स्थापन करण्यासाठी अधिसूचना जाहीर करत त्याबाबत हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्तांकडे हरकती, सूचना दाखल करण्यात आल्या आणि ११ व १२ मार्च रोजी आयुक्तांनी त्यावर सुनावणी घेतली. कोकण विभागीय आयुक्तांनी १३ मार्च रोजी याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.


हेही वाचा – उद्योजक हुंडेकरी अपहरण प्रकरणातील मुख्य आरेपीला बेड्या


शीळ कल्याण रस्त्याच्या पश्चिमेला असणाऱ्या ९ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्यामुळे ही ९ गावे महानगरपालिका क्षेत्रात कायम राहणार असून इतर अठरा गावांची स्वतंत्र नगरपरिषद होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

First Published on: March 14, 2020 7:18 PM
Exit mobile version