पुण्यात दोन जणांवर ऑक्सफर्ड लसीची चाचणी!

पुण्यात दोन जणांवर ऑक्सफर्ड लसीची चाचणी!

Corona Vaccine: चीनमध्ये लोकांना दिली जातेय गुपचूप कोरोना लस

पुण्याच्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये आज दोन स्वयंसेवकांना ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस देण्यात आला. ऑक्सफर्डच्या लसीची देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यात करण्यात आली अशी माहिती डॉ. संजय ललवाणी यांनी दिली. या दोन स्वयंसेवकांना ०.५ एमएलचा डोस देण्यात आला. प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी पात्र ठरलेल्या दोन स्वयंसेवकांना कोरोना लसीचा डोस दिला. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय तणासण्या केल्यानंतर हा डोस देण्यात आला.

आता ही लस दिल्यानंतर लसीचे काही साईड इफेक्ट होतात किंवा नाही हे तपासण्यासाठी या दोन्ही स्वयंसेवकांना काही तास रूग्णालयात थांबाव लागणार आहे. पुढचे काही दिवस या स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेऊन असणार आहोत. २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस दिला आहे.

या चाचणी प्रक्रियेचा भाग म्हणून तीन पुरूष आणि महिलांची तपासणी करण्यात आली. या लसीसाठी चाचणी प्रक्रिया मंगळवारपासून सुरु झाली होती. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेन्नर इन्स्टिटयूटने ही लस बनवली आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ या नावाने ही लस दिली जाणार आहे.

भारतात एकूण १७ वैद्यकीय संस्थांमध्ये या लसीची मानवी चाचणी होणार आहे. यामध्ये मुंबई महापालिकेतर्फे चालवले जाणारे परेलमधील केईएम हॉस्पिटल आणि मुंबई सेंट्रल येथील बीवायएल नायर हॉस्पिटलचा समावेश आहे. ब्रिटीश-स्वीडीश औषध कंपनी अस्त्राझेनेकासोबत सिरमने देशात एक अब्ज लसीचे डोस बनवण्याचा करार केला आहे.

पाच जणांवर होणार होती चाचणी

यासाठी तीन पुरूष आणि दोन महिलांची तपासणी करण्यात आली. त्यात तिघांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळून आल्या. त्यामुळे ते लस चाचणीसाठी अनफीट ठरले. अँटीबॉडीज म्हणजेच कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी त्यांच्या शरीरात एक नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण होणे. पुण्यात आज पाच जणांची चाचणी होणार होती. त्यात तिघांच्या शरीरात अशा अँटीबॉडीज आढळून आल्या.


हे ही वाचा- Corona Vaccine: रशियाच्या लसीबाबत भारताला विश्वास; आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती


First Published on: August 26, 2020 5:07 PM
Exit mobile version