Oxygen Shortage: पश्चिम महाराष्ट्रातील ऑक्सिजन पुरवठा कर्नाटक सरकारने रोखला, रिकामा टँकर राज्यात परतला

Oxygen Shortage: पश्चिम महाराष्ट्रातील ऑक्सिजन पुरवठा कर्नाटक सरकारने रोखला, रिकामा टँकर राज्यात परतला

Oxygen Shortage: पश्चिम महाराष्ट्रातील ऑक्सिजन पुरवठा कर्नाटक सरकारने रोखला, रिकामा टँकर राज्यात परतला

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस मोठ्या संख्येने कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. नव्या कोरोनाबाधितांना तसेच रुग्णालयात असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सीजनची गरज भासत आहे. वाढत्या कोरोना ऑक्सीजनच्या मागणीमुळे राज्य सरकारने केंद्राकडून ऑक्सीजन पुरवण्याची मागणी केली होती. यानुसार कर्नाटकसह अन्य राज्यातूनऑक्सीजन पुरवण्यात येत होता. परंतु सातारा,सांगली, कोल्हापूरला पुरवण्यात येणारा ऑक्सीजन कर्नाटक सरकारने रोखला आहे. सातारा सांगली कोल्हापूरमध्ये ऑक्सीजन संकट उद्भवणार आहे.

राज्यात कोरोना रुग्णासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सीजनची गरज भासत आहे. या रुग्णांना ऑक्सीजन मिळण्यासाठी आणि महाराष्ट्रातील ऑक्सीजनची कमरतरा दुर करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्याला ऑक्सीजन पुरवण्यात येत होता. केंद्र सरकार वेगवेगळ्या राज्यातू राज्याला ऑक्सीजन पुरवत होते. सातारा,सांगली,कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला कर्नाटकमधून ५० मेट्रिक टन ऑक्सीजन पुरवठा करण्यात येत होता. परंतु आज कर्नाटक सरकारने ऑक्सीजन पुरवठा रोखला आहे. यामुळे कर्नाटकमधून ऑक्सीजन टॅंकरला रिकामे परतावे लागले आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना परिस्थिती भयंकर झाली आहे. सध्या ४३ मेट्रिक टन ऑक्सीजनची गरज संगलीला आहे. कर्नाटकने ऑक्सीजन रोखल्यामुळे कोरोना रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासण्याची शक्यता आहे.

कर्नाटक सरकारने ऑक्सीजन पुरवठा रोखला असल्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये जातीन लक्ष द्यावे असे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मागणी केली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करुन ऑक्सीजन पुरवठा सुरळीत करुन द्यावा अन्यथा कोल्हापूरमधून गोव्याला होणारा ऑक्सीजन पुरवठा रोखून तो कर्नाटकमधून पुरवावा अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.

हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ PSA प्रकल्प कार्यान्वित

ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए ) बसविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादीत असून त्याची मागणी १७५० मेट्रीक टन एवढी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन निर्मिती व्हावी साठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

First Published on: May 6, 2021 7:41 PM
Exit mobile version