ओझर कोरोनामुक्त ; बाधित रुग्णाला डिस्चार्ज

ओझर कोरोनामुक्त ; बाधित रुग्णाला डिस्चार्ज

ओझर येथील सायखेडा रोड परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती मुंबई येथून आल्यानंतर दिनांक १४ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण ओझर तणावाखाली वावरत होते. यातील सर्व संपर्कातील स्वॅब निगेटिव्ह आले असून, पहिल्या रुग्णाचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याला आता डिस्चार्ज देण्याचे आल्याचे आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले. ओझरचे आतापयर्र्ंतचे सर्व १७ अहवाल निगेटिव्ह आल्याने आता ओझर परिसरात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने ओझरकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नियमानुसार कोरोनामुक्त व्यक्तीस सात दिवस घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ओझरचे सर्व व्यवहार शासकीय नियमानुसार सुरळीत सुरु आहेत.

First Published on: May 21, 2020 4:48 PM
Exit mobile version