coronavirus : सुन बेटा पाकिस्तान…

coronavirus : सुन बेटा पाकिस्तान…

भारतात १.३ अब्ज लोकांसाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर हा प्रयत्न जगातला सर्वात मोठा करोना प्रतिबंधासाठीचा अटकाव मानला जात आहे. पण लोकांना किराणा माल आणि केमिस्टकडे गर्दी करण्यापासून मात्र रोखता आलेले नाही. भारतापाठोपाठ आता पाकिस्तानातही लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानात आता करोना पॉझिटीव्हचा आकडा हा १ हजारांवर पोहचला आहे. भारतातल्या करोनाच्या आकडेवारीपेक्षा पाकिस्तानात करोनाची आकडेवारी ही जवळपास दुप्पट आहे. भारताकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांवर पाऊल ठेवत आता पाकिस्तानातही काही भागात लॉक डाऊन सुरू करण्यात आले आहे.

पाकिस्तानातील सिंध प्रांतात तसेच कराचीमध्ये लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. संपुर्ण पाकिस्तानाच लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली नाही. पाकिस्तानेच पंतप्रधान इम्रान खान यांनी संपुर्ण देशात लॉक डाऊनसाठी नकार दिला आहे. संपुर्ण देशात लॉक डाऊनमुळे गरीबांचे हाल होतील म्हणूनच संपुर्ण पाकिस्तानात लॉकडाऊन करण्यात आला नाही. पाकिस्ताना पाठोपाठ श्रीलंकेतही खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सीम्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच श्रीलंकेत सर्व एअरपोर्ट आणि सर्व उड्डाणेही बंद करण्यात आली आहेत.

पाकिस्तानात ३१ मार्चपर्यंत सर्व प्रकारच्या रेल्वे प्रवासाला मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांनी कराची आणि लाहोर रेल्वे स्टेशनवर लोकांनी शटडाऊनच्या घोषणेआधी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पाकिस्तानात अनेक ठिकाणी खेडोपाडी मात्र लोकांनी या लॉक डाऊनला प्रतिसाद दिला नाही. अनेक ठिकाणी फार्मसी, किराणा माल आणि दुकाने खुली होती. पाकिस्तानात १ हजार करोना पॉझिटीव्ह झाले आहेत. तर करोनामुळे मृत झालेल्यांची संख्या ७ पर्यंत पोहचली आहे.

First Published on: March 25, 2020 6:42 PM
Exit mobile version