Live Updates : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे निधन

Live Updates : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे निधन

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे निधन

21मोहाली येथील रुग्णालयात अखेरचा श्वास

प्रकाशसिंग बादल पाच वेळा राहिले होते पंजाबचे मुख्यमंत्री


राहुल गांधीनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणाच्या याचिकेवर २७ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता

गुजरात न्यायालयात होणार सुनावणी


नागपुरात जुगार खेळणाऱ्या चार पोलिसांना करण्यात आले निलंबीत


बंगालमधील उत्तर दिनाजपूरमध्ये अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी नागरिकांचे निदर्शन

संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनला लागली आग


ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत बारसू गावातील आंदोलकांची भेट घेणार

उद्या (ता. 26 एप्रिल) सकाळी 11 वाजता घेणार भेट


संजय राऊतांच्याविरोधातील पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील सुनावणी १५ जूनला

राऊतांचा जामीन रद्द करण्याची याचिका ईडीने केली होती दाखल


पनवेल-महाड शिवशाही बसचा कर्नाळा खिंडीत अपघात


आदित्य ठाकरेंचे मुंबईचा महापालिका आयुक्तांना पत्र

मेगा रस्त्याच्या गलथान कारभारावर आदित्य ठाकरेंनी पत्र लिहिले आहे. या उत्तरांशिवाय संपूर्ण रस्त्यांची निविदा प्रक्रिया फसवी असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले


सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांसह परदेशी नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेने वेग

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांसह इतर परदेशी नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेने वेग आला आहे. भारतीयांची पहिली तुकडी सुदानमधून रवाना झाली आहे. भारतीय युद्धनौका INS सुमेधा 278 जणांसह जेद्दाहून रवाना झाली.


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर पुन्हा जो बायडन दावा करणार

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन हे २०२४ मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत पुन्हा दावेदारी करणार आहे


सतेज पाटील गटाचा उमेदवार पराभूत

महाडिक गटाची विजयाच्या दिशेन घौडदौड सुरू

राजाराम कारखाना निवडणुकीत ९ पैकी ६ गटात महाडिक गट विजयी मिळला आहे. महादेव महाडिकांना ८३ मतांनी विजीय झाला आहे.


अनिल देशमुखांची जामीन अट शिथिल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईच्या विशेष पीएमएल न्यायालयाने जामीन अट शिथिल केली  आहे. ईडीने देशमुखांविरुद्धा नोंदविलेल्या पीएमएल प्रकरणावर ते जामिनावर बाहेर आले आहेत. देशमुखांना १८ जूनपर्यंत नागपूर आणि देशातील इतर ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.


मुंबईतील मुलुंडमध्ये पाच मजली इमारतीला भीषण आग लागली आहे


रिफायनरीवर लोकांशी चर्चा करून मार्ग निघू शकतो- अजित पवार

स्थानिकांची बाजू राज्य सरकारन ऐकून घ्यावी. आणि बारसूतील लोकांशी चर्चा करून मार्ग काढवा, असे अजित पवार म्हणाले


बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्पासंदर्भात लोकांमध्ये मोठा असंतोष – भारस्कर जाधव

कोकणातील जनता समजून घेणारी आहे. सरकारने दडपशाही करू नये. बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्पासंदर्भात लोकांमध्ये मोठा असंतोष आहे


बारसू रिफायनरीविषयी चर्चा करण्यासाठी संजय राऊत आणि विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. यासाठी संजय राऊत हे मातोश्रीवर निवासस्थानी जाणार


बारसूत आंदोलकांना ठेचण्याचा प्रयत्न सुरू – विनायक राऊत

रिफायनरीसाठी बारसूत येथे जमीन सर्वेक्षणा सुरू आहे. बारसूत आंदोलना ठेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थानिक भूमिपुत्रांना मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे विधानयक राऊत म्हणाले


खारघर दुर्घटनेविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

या राजकीय फायद्यासाठी गर्दी जमवल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिकेत केली आहे.


आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्याविरोधात संजय राऊतांची सीबीआयकडे तक्रार

भाजप आमदार राहुल कुल यांच्या भीमा पाटस साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे सीबीआयकडे तक्रार केली आहे.


रिफायनरीला स्थानिकांचा नागरिकांचा विरोध

रिफायनरीच्या जमीन सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध कायम आहे. या रिफायनरीला विरोध करणाऱ्या महिलांनी रस्त्यावर झोपून सर्वेक्षणाला विरोध केला आहे. बारसूमध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.


राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  पुढील ४ दिवस राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. नागपूर, गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्याला गारपिटीचा इशारा दिला आहे.


पंतप्रधान मोदी आज केरळसह दादरा नगर हवेली दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज केरळसह दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीवच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते आज केरळमधील पहिल्याच केरळमधील पहिल्याच वंदे भारत एक्सप्रेसलाला हिंरवा झेंडा दाखविणार आहेत.


आजपासून केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुली

भारतातील १२ ज्योर्तिलिंगांना फार महत्त्व आहे. केंदारनाथ मंदिराचे कवाडे सहा महिन्याच्या कालावधीनंतर उघडली. यासाठी मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. यासीठी जवपासू २० क्ट्विटल फुलांचा वापर करण्यात आला.


पाकिस्तानी वंशाचे लेखक-पत्रकार तारिख फतेह यांचे निधन

तारिख फतेह यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेचा श्वास घेतला. तारिख फतेह गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. तारिक फतेह यांच्या कन्या नताशा फतेह यांनी ट्वीट करून त्यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली.


 

First Published on: April 25, 2023 9:10 PM
Exit mobile version