संतापजनक! पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

संतापजनक! पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

वसई: सातपटीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर आठ जणांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठही आरोपींना अटक केली आहे. 17 डिसेंबर रोजी दुपारी 2.00 वाजताच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी सातपाटी पोलीस ठाण्यात येत त्यांची अल्पवयीन मुलगी ही काल रात्रीपासून घरी आली नसल्याचे सांगितले. तसेच तिला फोन लावला असता, ती फोनवर रडते अशी माहिती दिली. त्यानंतर तांत्रिक बाबींचा आधार घेत सदर मुलीचा शोध घेण्यात आला. या पीडित मुलीशी सायंकाळच्या सुमारास मौजे हरणवाडी येथून ताब्यात घेण्यात यश आले.

अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत पोलिसांनी तिची विचारपूस केली. यावेळी मुलीने तिच्यासोबत झालेल्या कृत्याची माहिती पोलिसांना दिली. पीडितेने सांगितले की, मौजे माहिम येथील समुद्रकिनारी असलेल्या एका बंद बंगल्यात तसेच माहिम समुद्रकिनारी असलेल्या झाडीमध्ये 16 डिसेंबर रोजी रात्री 8.00 वाजता ते 17 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजताच्या दरम्यान एकूण 8 आरोपींनी तिच्यावर तिच्या इच्छेविरुध्द सामूहिक पध्दतीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. हे दुष्कृत्य पीडित मुलीच्या मित्राने घडवून आणला असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सामूहिक बलात्काराचा प्रकार उजेडात आला.

आरोपी माहीम, हनुमान पाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील रहिवासी असून यातील अनेक तरुण हे नशेच्या आहारी असल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही आरोपी हे अल्पवयीन असल्याचेही समजते. सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

याप्रकरणी एकूण 8 आरोपींविरूध्द सातपाटी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्र. ९४/T २०२२ भारतीय दंड संहिता अधि. १८६० चे कलम ३७६, डी. ए. ३७६ (३), ३६६ ए, ३४१, ३४२, ३२३, ५०४, ५०६ सह पोक्सो अॅक्ट ४, ६, ८, १२ अन्वये दाखल करण्यात आला आहे.  सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी निता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पालघरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, प्रेमनाथ ढोले, सहायक पोलीस निरीक्षक सातपाटी पोलीस ठाणे यांची तपास पथके तयार केली.

या पथकांनी सर्व आरोपींना दिनांक 18 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास  निता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग यांच्यामार्फत केला जात आहे.


क्लिन चिट तुमच्याच व्याहींनी दिली; किरीट सोमय्या यांचा राऊतांवर पलटवार

First Published on: December 18, 2022 2:13 PM
Exit mobile version