देवाचिये द्वारी बडव्यांची अरेरावी

देवाचिये द्वारी बडव्यांची अरेरावी

पंढरीच्या विठ्ठलाचे दरवाजे सर्व भक्तांसाठी उघडे असून विठ्ठलाला देखील सर्व भक्त सारखे असतात. मात्र देवाचिये द्वारीमध्ये बडव्यांची अरेरावी पंढरपुरात पहायला मिळत आहे. पंढरीच्या गाभाऱ्यात एका छोट्याशा कारणांवरुन मंदिरामध्ये असणाऱ्या सरकारी बडव्यांनी भक्ताच्या श्रीमुखात लगावली आहे.

नेमके काय घडले?

बुधवरी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय सुसे या भक्तांनी विठ्ठलाच्या मूर्तीवर हार घालण्याचा प्रयत्न केला. मात्र मूर्ती आणि भक्तामध्ये अंतर असल्याने त्यांनी तो हार मूर्तीच्या दिशेने फेकला. त्यामुळे वाद होण्यास सुरुवात झाली. हा वाद इतका वाढला कि विठ्ठलाचे पुजारी अशोक भंडगे यांनी दत्तात्रय यांच्या श्रीमुखात लगावून दिली. दरम्यान हे प्रकरण पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गेले.
३ वर्षांपूर्वी देखील बडव्यांच्या कारभारामुळे भक्त हैराण झाले होते. बडव्यांविरोधात ३० वर्षांपासून असंतोष उफाळत होता. सरकारने त्या ठिकाणी हस्तक्षेप करुन बडव्यांची नेमणूक केली. मात्र हे सरकारी बडवे देखील मुजोर असल्याचे समोर आले आहे.

मूर्तीच्या शेजारी असणाऱ्यांना त्या मूर्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी असते. मात्र सदर प्रकार मंदिराचे कर्मचारी यांना याबाबत माहिती देणे गरजेचे होते. मात्र पुजाऱ्यांनी तसे न करता भक्ताच्या श्रीमुखात लगावून दिली. या प्रकाराला समिती कधीही पाठिशी घालणार नाही.  – विलास महाजन, मंदिर व्यवस्थापक

First Published on: October 11, 2018 4:57 PM
Exit mobile version