देशातल्या तरुणांपर्यंत अंमली पदार्थ पोहोचतात कसे?; पंकजा मुंडेंचा सवाल

देशातल्या तरुणांपर्यंत अंमली पदार्थ पोहोचतात कसे?; पंकजा मुंडेंचा सवाल

BJP leader Pankaja Munde claim that 2019 election 25 MLA Elected i contribute in it

अंमली पदार्थांच्या कारवायांवरुन जोरदार राजकीय घमासान सुरु आहे. दरम्यान, यावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. अंमली पदार्थांच्या कारवायांवर मला बोलायचं नाही. पण देशातल्या तरुणांपर्यंत अंमली पदार्थ पोहोचतात कसे? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. मुंबईत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात होत असल्याच्या आरोपांवर बोलू इच्छित नाही. कोणत्याही व्यक्तीविषयी, पक्षाविषयी, समाजविषयी, धर्माविषयी बोलण्याचा हा विषय नाही, असं मला वाटतं. मी कुणावरही आरोप करणार नाही. या देशातला तरुण आहे, त्याच्या पर्यंत अंमली पदार्थ पोहोचता कसे? हा चर्चेचा विषय आहे. त्यातून ते कसे बाहेर पडतील याची चिंता आपल्याला हवी, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

महाराष्ट्राइतकं प्रेम मध्यप्रदेशमध्ये मिळालं

पंकजा मुंडे यांनी मध्यप्रदेशचा दौरा केला. यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. गोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणून महाराष्ट्रात जे प्रेम मिळतं ते मध्य प्रदेशमध्येही मिळालं. मुंडे साहेबांनी मध्य प्रदेशात केलेलं काम पाहण्याची संधी मिळाली. मध्य प्रदेशात खूप छान प्रतिसाद मिळालं. मध्य प्रदेश भाजप संघटनेकडून शिकायला मिळालं. तिथलं काम, तिथली संघटना कशी असू शकते हे पाहायला शिकायला मिळालं. तिथं आमच्या जागा निवडून येतील, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तिथल्या निवडणुकीच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळाला, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

 

First Published on: October 27, 2021 3:45 PM
Exit mobile version