अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करा; परमबीर सिंहाची हाय कोर्टात तिसरी याचिका

अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करा; परमबीर सिंहाची हाय कोर्टात तिसरी याचिका

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. परमबीर सिंह यांची ही तिसरी याचिका आहे. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या आरोपानंतर परमबीर सिंह यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांच्या याचिकेवर ४ जून रोजी सुनावणी होणार आहे.

परमबीर सिंह यांच्याविरोधात अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात २८ एप्रिला अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, परमबीर सिंह यांनी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ४ जून रोजी सुनावणी होणार आहे.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांवर आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांच्यावर पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्रास देणे, धमक्या देणे या अंतर्गत तसंच अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यातल्या कोतवाली पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, डीसीपी पराग मणेरे आणि आणखी काही अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर यांच्या सह ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायदा, भ्रष्ट्राचार आदी कलम लावण्यात आले आहेत. दरम्यान, अकोल्यातून गुन्हा दाखल करून तपासासाठी ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली.

 

First Published on: May 6, 2021 11:37 AM
Exit mobile version