ईडीकडून पुन्हा समन्स; देशमुखांकडून वय, आजारपणाचं कारण पुढे, जबाब व्हिसीद्वारे घेण्याची विनंती

ईडीकडून पुन्हा समन्स; देशमुखांकडून वय, आजारपणाचं कारण पुढे, जबाब व्हिसीद्वारे घेण्याची विनंती

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी वसूलीच्या आरोप प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीने तपासासाठी समन्स बजावले आहेत. मात्र, अनिल देशमुख चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. त्यांनी वय, कोरोना आणि आजारपणाचं कारण पुढे करत व्हिडिओद्वारे जबाब घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी याबाबत एक पत्र लिहिलं आहे.

माझे वय, तसंच कोविड-१९ चा धोका, सरकार कडून लावण्यात आलेले निर्बंध या सर्व गोष्टींचा विचार करून मी ईडी कार्यलयात हजर राहू शकत नाही. जमल्यास माझा जबाब ऑडिओ, व्हिडिओमार्फत रेकॉर्ड करण्यात यावा असं विनंती पत्र अनिल देशमुख यांनी ईडीला वकिलामार्फत पाठवलं आहे. वकिलामार्फत ईडीकडून इसीआरची कॉपी देण्यात यावी, तसंच कुठल्या कागदपत्राची पूर्तता करायची आहे याची यादी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांचे वकील इंद्रजित सिंग यांनी दिली.

अनिल देशमुख यांना २६ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, त्या दिवशी देशमुख यांनी विनंती अर्ज देऊन चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अधिकचा वेळ मागितला होता. देशमुख यांच्या विनंतीनंतर ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना सवलत दिली होती. मात्र, त्यानंतर अनिल देशमुख यांना २९ जून रोजी म्हणजेच आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, आज देखील अनिल देशमुख उपस्थित राहणार नसल्याची शक्यता आहे.

 

First Published on: June 29, 2021 11:29 AM
Exit mobile version