नवस फेडण्यासाठी मुलाला ८ किमी विवस्त्र चालवले

नवस फेडण्यासाठी मुलाला ८ किमी विवस्त्र चालवले

नवस फेडण्यासाठी मुलाला आठ किमी विवस्त्र चालवत नेले (फोटो सौजन्य : लोकमत)

असं म्हणतात की ‘श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी’. अंधश्रद्धेमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रसंगी काहींचे जीवही गेले आहेत. जग २१ व्या शतकात जरी वाटचाल करत असले, तरी देशातल्या या गोष्टी आपण अजूनही मागच्याच शतकात असल्याचं सिद्ध करत आहेत. अशीच एक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. अंधश्रद्धेपोटी एका तीन वर्षाच्या मुलाला तब्बल आठ किलोमीटर विवस्त्र चालवत नेल्याचा धक्कादायक आणि अघोरी प्रकार घडला आहे.

हा होता नवस

सोलापूरमधील संगमेश्वर नगर येथे बाप्पा नवसाला पावल्यामुळे आपल्या लहानग्या चिमुरड्याला आठ किमी विवस्त्र चालवत नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संगमेश्वर नगरमध्ये राहणारे ट्रक चालक नागेश रणधिरे आणि त्यांची पत्नी शीतल रणधिरे यांनी बाळासाठी नवस केले होता. नवस पूर्ण झाल्यानंतर मुलाला आठ किमी विवस्त्र चालवत तुझ्या दर्शनाला घेऊन येऊ असा नवस सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या हिप्परगानजीकच्या मश्रुम या गणपतीला केला होता. त्याप्रमाणे रणधिरे कुटुंबाचा नवस पूर्ण झाल्याने तो नवस फेडण्यासाठी बुधवारी सकाळी या दाम्पत्याने चिमुरड्याला घेऊन संगमेश्वर येथून मुख्य रस्त्याने चालवत नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

हे वाचा – मूल पाहिजे, माझ्यासमोर सेक्स करा; भोंदूबाबा गजाआड

अंधश्रद्धा नसून श्रद्धा आहे

याप्रकाराबाबत रणधिरे कुटुंबाला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमची अंधश्रद्धा नसून आमची गणपतीवर श्रद्धा आहे. त्यामुळे आम्ही देवाकडे नवस केला आणि आमचा तो नवस पूर्ण झाला असल्याने तो फेडण्यासाठी आम्ही गेलो.

वाचा – पुण्याच्या शिरुमध्ये अंधश्रद्धेचा थरार!

First Published on: October 25, 2018 11:16 AM
Exit mobile version