व्यसनमुक्तीसाठी दाखल झालेल्या रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

व्यसनमुक्तीसाठी दाखल झालेल्या रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

व्यसनमुक्तीसाठी दाखल झालेल्या रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

सांगवीच्या औंध येथील उरो रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून रुग्णाने उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेत रुग्णाचा पाय जायबंदी झाला असून चेहऱ्याला गंभीर इजा झाली आहे. सुधीर बबन जगताप असे या रुग्णाचे नाव आहे. त्यांना ससून रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले आहे. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, हे अजून स्पष्ट झालले नाही. ते व्यसनमुक्तीसाठी रुग्णालयात दाखल झाले होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर बबन जगताप वय ३८ हे सांगवी (औंध) उरो रुग्णालयात २४ डिसेंबर पासून उपचार घेत होते. सुधीर यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील साखर कमी झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यासाठीच ते उरो रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु, बुधवारी रात्री सातच्या सुमारास अचानक ते धावत सुटले आणि दुसऱ्या मजल्यावरून उडी घेण्याचा प्रयत्न करत होते. हे नाट्य बऱ्याच वेळ सुरू होते. याची माहिती पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाला देण्यात आली.दरम्यान, रुग्णालयतील कर्मचाऱ्यांनी आणि इतर रुग्णांनी त्यांना समजवण्याचा फार प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले. त्यांनी देखील जगताप यांना खाली उतरण्याची विनंती केली. परंतु, जगताप तरीही खाली येम्यास तयार नव्हते. त्यांनी थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जगताप गंभीर जखमी झाले आणि त्यांनी त्यांचा पाय जायबंदी झाला. त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर देखील गंभीर इजा झाली. जगताप यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

First Published on: December 27, 2018 10:23 AM
Exit mobile version