pegasus : पेगाससवरून भाजप-काँग्रेस आमनेसामने, मंगल प्रभात लोढा, झिशान सिद्दीकी पोलिसांच्या ताब्यात

pegasus : पेगाससवरून भाजप-काँग्रेस आमनेसामने, मंगल प्रभात लोढा, झिशान सिद्दीकी पोलिसांच्या ताब्यात

pegasus : पेगाससवरून भाजप-काँग्रेस आमनेसामने, मंगल प्रभात लोढा, झिशान सिद्दीकी पोलिसांच्या ताब्यात

पेगासस हेरगिरी सॉप्टवेअरच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात आंदोलन केलं तर भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भाजपकडून या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये आमदार प्रसाद लाड सहभागी झाले होते. पेगाससचा वापर करुन देशातील नेत्यांवर पाळत ठेवण्यात येत असल्याचा आरोप झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. आंदोलन चिघळू नये यासाठी आमदार झिशान सिद्दीकी आणि भाजप आमदार मंगल प्रभात लोढा, प्रसाद लाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मुंबईत काँग्रेसकडून भाजपविरोधात पेगासस प्रकरणावरुन आंदोलन करण्यात आले. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत होते. आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला होता. तर भाजपकडूनही काँग्रेसविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. पेगाससवर बसून चर्चा करावी असे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या आंदोलनापूर्वीच भाजपने मोर्चा काढला होता. पोलिसांकडून आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात येत होती. आंदोलनादरम्यान कोणताही प्रकार घडू नये यासाठी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचे काम पोलीस करत होते. यानंतर पोलिसांनी त्यांना जागेवर बसूनच आंदोलन करण्याचे आवाहन केले.

झिशान सिद्दीकींना अटक करा – प्रसाद लाड

भाजपच्या कार्यालयावर कोणीही गुंड पद्धतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर अशाच पद्धतीने उत्तर देऊ, आम्ही संघर्ष करणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला धमक्या देऊ नका, भाजपचे जे श्रद्धास्थान आहे, वसंत स्मृती जे प्रमोद महाजन यांनी बांधले आहे. त्यावर काँग्रेस हल्ला करणार असेल तर त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देऊ. झिशान सिद्दीकींना अटक केली नाही तर आम्ही बंदोबस्त तोडून पुढे जाऊ असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे.

पेगाससवरुन झिशान सिद्दीकींचा भाजपवर निशाणा

पेगाससच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी आंदोलन केलं आहे. यावेळी झिशान सिद्दीकी म्हणाले की,सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशांसह देशातील नागरिक सुरक्षित नाही. प्रत्येकाचा फोन टॅप करण्यात येत आहे. कॅमेरा हॅक करण्यात येत आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई पेगाससवरुन का करण्यात आली नाही? लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी सरकारकडे आहे. पेगाससच्या सॉफ्टवेअरमध्ये ज्या लोकांचे नाव आले आहेत. राहुल गांधी, पत्रकार, न्यायाधीश आणि बड्या राजकारण्यांची हेरगिरी केंद्रातील भाजपने बंद करावे आणि कारवाई करण्यात यावी अशी मागणी सिद्दीकी यांनी केली आहे. तसेच  भाजपचे कार्यकर्ते तयार आहेत तर आम्ही पण पुढे जाण्यास तयार आहोत असा इशारा झिशान सिद्दीकी यांनी दिला आहे.


हेही वाचा : Wine : सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीची परवानगी, शरद पवार म्हणतात विरोध फार चिंतेचा….

First Published on: February 2, 2022 1:28 PM
Exit mobile version