भस्म्यारोग झालेल्यांना शिवसेनेची प्रत्येक गोष्ट गिळायची आहे, भास्कर जाधवांचा हल्लाबोल

भस्म्यारोग झालेल्यांना शिवसेनेची प्रत्येक गोष्ट गिळायची आहे, भास्कर जाधवांचा हल्लाबोल

bhaskar jadhav

Bhaskar Jadhav On Shinde Group | मुंबई – “एखाद्या माणसाची भूक किती असावी. शिवसेना पक्ष आणि निशाणी चोरली आहे. आता अजेंडा सुद्धा चोरायचा आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर निष्ठेने राहिलेल्या आमदारांना निलंबीत करून जर कोणाची भूक भागत असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. ज्यांची भूक भागत नसते, त्यांना भस्म्या रोग झाला आहे, असं म्हणतात. ज्यांना भस्म्या रोग झाला आहे, त्यांना शिवसेनेची प्रत्येक गोष्ट गिळायची आहे,” असा हल्लाबोल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुढे भास्कर जाधव म्हणाले की, देशात पहिलं उदाहरण आहे, मूळ शिवसेना मालकाच्या हातून काढली आहे. ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना नेऊन शिवसेना दिली आहे. पण, हा लोकशाहीला मारक निर्णय आहे. संपूर्ण देशाला या निर्णयाचे परिणाम भविष्यात भोगावे लागणार आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनीही निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे.


रामदास कदमांवरही निशाणा

शिंदे गटाचे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा आरोप केला होता. त्यांनी योगश कदमांविरोधात कट रचला असल्याचा दावा केला. यावरून भास्कर जाधवांना विचारलं असता ते म्हणाले की, “रामदास कदमांसारखा बेवडा दुसरा काही बोलू शकतो का? त्यांना तेवढीच अक्कल आहे.”

संजय राऊतांचाही जीव धोक्यात असल्याचं म्हटलं जातंय. त्यांना मारण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचा गौप्यस्फोट करण्यात आलाय. यावर भास्कर जाधव म्हणाले की, “देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री या नात्याने संजय राऊतांच्या पत्राची गंभीर दखल घेऊन चौकशी करायला हवी होती. पण, त्यांनी त्या पत्राची टिंगल-टवाळी केली आहे. ‘स्टंटबाजी आणि सुरक्षा मिळवण्यासाठी पत्र लिहलं आहे,’ असं फडणवीस म्हणाले. मात्र, देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलत आहेत.”

First Published on: February 22, 2023 8:17 PM
Exit mobile version