Coronavirus : ३५० रुपयांचे ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्यूपमेंट’ (पीपीई) किट तयार

Coronavirus : ३५० रुपयांचे ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्यूपमेंट’ (पीपीई) किट तयार

छत्तीसगड स्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) ने केवळ ३५० रुपयांमध्ये पर्सनल प्रोटेक्शन इक्यूपमेंट (पीपीई) किट तयार केले आहे. कोरोना बाधित रुग्णांचे उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचारी पुन्हा-पुन्हा उपयोग करू शकतात. माणसाच्या डोक्यापासून ते छातीपर्यंत संरक्षित केले जाऊ शकते, असे हे किट आहे. मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागाने किट तयार केले आहे. यांनी कोरोना व्हायरसला रोखण्याचा दावा केला आहे.

संस्थानाचे संचालक रजत मुना म्हणाले की, आम्ही जो किट तयार केला आहे. तो एकदा वापरल्यावर पुन्हा वापरू शकतो. आयआयटी भिलाईने या किटची माहिती केंद्रीय विज्ञान आणि प्राद्योगिकी मंत्रालयाला दिली आहे. आयआयटीने मंत्रालयाला दिलेल्या माहितीनुसार, या किटचा वापर डॉक्टर, नर्सिग स्टाफ आणि खासकरून असे कर्मचारी जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे उपचार करत आहेत. त्यांच्यासाठी फायद्याचे आहे.

किटचे वैशिष्ट्ये

किटमध्ये एन-९५ मास्कमध्ये वापरले जाणारे फिल्टर लावण्यात आला आहे. हा मनुष्याला डोक्यापासून ते छातीपर्यंत कव्हर केलं जाऊ शकते. यात शुद्ध हवा आत जाऊ शकते आणि कोरोना व्हायरसला रोखू शकते. किट परिधान केल्यावर श्वास घेण्यास समस्या निर्माण होत नाही. चांगल्या दर्जाचे किट असून हे स्वस्त आहे.

दोन प्रकारचे किट तयार करण्यात आले

हे किट दोन प्रकारे तयार करण्यात आले आहे. पहिले हेल्मेट सारखे पीपीई किट आहे. याची किंमत २०० रुपये आहे. आणि हे फक्त चेहऱ्याचे संरक्षण करते. याचप्रमाणे दुसरी फेस सील टाइप पीपीई किट आहे. ज्याची किंमत ३५० रुपये असून डोक्यापासून ते छातीपर्यंतचा शरीराचा भाग सुरक्षित ठेवला जाऊ शकतो.

First Published on: April 10, 2020 12:06 PM
Exit mobile version