मराठा आंदोलना विरोधातील याचिका मागे घेणार

मराठा आंदोलना विरोधातील याचिका मागे घेणार

मराठा आरक्षणाचा चेंडू हायकोर्टात

द्वारकानाथ पाटील या शेतकऱ्याने मराठा मोर्चांवर प्रतिबंध घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात ९ ऑगस्ट रोजी दाखल केली होती. मात्र आता आपण ही दाखल केलेली याचिका मागे घेणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील आशिष गिरी यांनी दिली आहे. हिंसाचार करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आंदोलकांकडून हिंसाचाराची दखल घेण्यात आली. त्यामुळे आमचा हेतू साध्य झाल्याचे कारण देत १३ ऑगस्टला आम्ही दाखल केलेली याचिका मागे घेणार असल्याचे वकील आशिष गिरी यांनी सांगितले.

काय होतं याचिकेत?

राज्यभरात सुरु असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चावर प्रतिबंध घालण्यात यावा आणि सार्वजनिक संपत्तीची नासधूस करणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. तसेच याचिकाकर्ते द्वारकानाथ पाटील यांचे वकील आशिष गिरी यांनी मोर्च्या दरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असून, यावेळी ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची मागणी आशिष गिरी यांनी याचिकेद्वारे केली होती. तसेच आंदोलन करणाऱ्यांवर १४९ कलमांतर्गत नोटीस बजावण्याची मागणी देखील करण्यात आली होती. त्याचसोबत हिंसाचार करणाऱ्याला शोधून काढावे अशी देखील त्यांनी मागणी या याचिकेत केली आहे.

औरंगाबाद आणि पुण्यात मराठा आंदोलक पेटले

औरंगाबाद आणि पुण्मयाध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा मराठा आंदोलक तापले. मराठा आंदोलकांनी औरंगाबादच्या वाळुंज परिसरामध्ये असणाऱ्या मल्टिनॅशनल आणि इतर कंपन्याची तोडफोड केली. तसंच खासगी वाहनांची तोडफोड करत पोलीस आयुक्तांच्या ताफ्यावर दगडफेक केली. तर पुण्यात देखील या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील लाईट फोडल्या होत्या. तर चांदणी चौकामध्ये हे आंदोलन जास्त पेटले. चांदणी चौक परिसरामध्ये देखील गाड्यांची तोडफोड केली.

First Published on: August 11, 2018 1:34 PM
Exit mobile version