Petrol Diesel Price: पोटनिवडणूकीतील पराभवामुळे इंधन दर कपातीचा निर्णय, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

Petrol Diesel Price: पोटनिवडणूकीतील पराभवामुळे इंधन दर कपातीचा निर्णय, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

Petrol Diesel Price: पोटनिवडणूकीतील पराभवामुळे इंधन दर कपातीचा निर्णय, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

देशातील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. लोकसभेच्या १ जागेवर तर काही राज्यांमध्ये विधानसभेच्या जागेवर भाजपची निराशाजनक कामगिरी झाली आहे. दरवाढ आणि महागाईमुळे जनता त्रस्त असल्याचे मोदी सरकारला समजले असावे यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. १०० रुपये वाढवून ५ रुपये कमी करायचे हे भाजपचे मोठे मन आहे का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी पेट्रोल डिझेलच्या दर कपातीवरुन केंद्रावर निशाणा साधला आहे. तसेच मोठं मन असेल तर ५० रुपये करुन दाखवा असे आव्हान दिलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, भाजपने मोठं मन दाखवायला मन असावं लागते मनच नाही तर मोठं मन काय दाखवणार, ५ रुपयांची नोट दाखवत आहात, किमान २५ रुपये दाखवायची होती आणि नंतर ५० दाखवायला पाहिजे होती. पहिले १०० रुपये वाढवायचे आणि नंतर ५ रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन मग १०० रुपये वाढवले हे सुद्धा मोठं मन आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तर ज्यांचे मन कठोर ते १००, दीडशे रुपये पेट्रोल करु शकतात असे राऊत म्हणाले. लोकं पेट्रोल पंपावर १५ रुपयांचे डिझेल टाकत आहेत. समोर मोदींचे होर्डिंग लावलेले असते आशीर्वाद देत असतात, हेही दिवस जातील २०२४ साली आम्ही पुन्हा पराभूत करु असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकार सतत केंद्राकडे बोट दाखवते असे विरोधक म्हणत असतात यावर राऊत म्हणाले, केंद्राकडेच बोट दाखवावे लागणार आहे. पेट्रोल डिझेलच्या दरासाठी केंद्राकडेच बोट दाखवणार राज्य सरकार पेट्रोल डिझेलचे दर वाढवत नाही. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कोणाकडे बोट दाखवले आहे. त्यांनी बोट दाखवले म्हणून त्यांची बोट छाटणार का तुम्ही? ते तुमचेच मुख्यमंत्री आहेत. तुम्ही देशाचे निर्णय घेता मग बोट कोणाकडे दाखवायचे अमेरिका, रशिया की फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडे दाखवायचे असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

राज्य सरकार दर कपात करण्यावर चर्चा करेल

केंद्राच्या निर्णयानंतर राज्य सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र सरकारमध्ये चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र सरकार सतत लोकांसाठी चर्चा करत असते. युवासेनेनंसुद्धा राज्यभर आंदोलन केलं होते. केंद्र सरकार हे या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. पेट्रोल डिझेलमध्ये बेहिशोबी कमावले आहे. लाखो कोटीमध्ये जमा केले आणि आता ५ रुपये कमी केले आहेत तेच २५ रुपये ३० रुपये केले असते तर तुमचे मन दिसले असते असे संजय राऊत म्हणाले.

पोटनिवडणूक हारल्यामुळे दर कपात

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, पोटनिवडणूक हारल्यावर केंद्राने ५ रुपये कमी केले आहेत. ५० रुपये कमी करण्यासाठी भाजपला किती वेळा पराभूत करावं लागेल आणि आम्ही २०२४ रोजी पूर्ण हरवून दर कमी करु असा चिमटा संजय राऊत यांनी काढला आहे.


हेही वाचा : केंद्रानंतर राज्य सरकार इंधनाचे दर कमी करेल ऐवढी दानत नाही, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल


 

First Published on: November 4, 2021 11:38 AM
Exit mobile version