हल्दीराम कंपनीच्या दुधात आढळले प्लास्टिक

हल्दीराम कंपनीच्या दुधात आढळले प्लास्टिक

हल्दीराम कंपनीच्या दुधात आढळले प्लास्टिक

नुकतिच कोजागीरी पौर्णिमा झाली आहे. या कोजागीरी पौर्णिमेनिमित्त घराघरामध्ये मसाला दुधाचा आस्वाद घेतला जातो. ऑफिस, घर अशा बऱ्याच ठिकाणी दुधाचा आस्वाद घेऊन कोजागीरी पौर्णिमा साजरी केली जाते. अशीच कोजागीरी पौर्णिमा चंद्रपुर येथे देखील साजरी करण्यात आली होती. त्या दरम्यान हल्दीराम कंपनीचे दूध मागवण्यात आले होते. मात्र या दुधाच्या पॉकेट मध्ये प्लस्टिक पॉडवरचा चुरा आढळल्यांने एकच खळबळ उडाली. काही दिवसापूर्वीच दुधामध्ये भेसळ झाल्याचे समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएने मुंबईच्या एंन्ट्री पॉंईटवर दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली देखील केली होती. त्यामुळे आपल्या घराघरामध्ये येणारे खरंच पिण्यायोग्य आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेमके काय घडले?

कोजागीरी पौर्णिमेनिमित्त गोंदिया जिल्याच्या देवरी तालुक्यात मंगळवारी देवरी तालुक्याच्या धुकेशवरी देवस्थानात कार्यक्रम राबवण्यात आला होता. या कार्यक्रमाकरता हल्दीराम कंपनीचे ४० लिटर दूध आणण्यात आले होते. हे दूध एका खोल पात्रात ओतण्यात आले असता त्यातून प्लास्टिक पाडवरचा चुरा आढळल्याने मोठी खळबळ उडाली.

या ठिकाणी केली तक्रार

दिवाळी आली का विविध दूध कंपन्या किंवा खाजगी व्यापारी दुधात भेसळ करतात हे आपण नेहमीच ऐकतो मात्र हल्दीराम सारख्या नामांकित कंपन्या देखील दुधात भेसळ करत असतील तर विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न देवरी वासियांना पडला आहे. संबधित कंपनीच्या अधिकऱ्यांनी समाधान कारक उत्तर न दिल्याने हे दूध परत पाठविण्यात आले आहे. तर याबाबत गावकऱ्यांनी हल्दीराम कंपनीच्या अधिकऱ्यांनाकडे आणि महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या वेब पोर्टल वर केली आहे.

वाचा – एफडीएने केली भेसळयुक्त दुधावर कारवाई

First Published on: October 24, 2018 4:21 PM
Exit mobile version