मोदींना मिळालेल्या भेटवस्तू खरेदीची संधी, तुम्हीही घेऊ शकता या वस्तू

मोदींना मिळालेल्या भेटवस्तू खरेदीची संधी, तुम्हीही घेऊ शकता या वस्तू

E-Auction: मोदींच्या भेटवस्तूंचा आज ई लिलाव; ऑलिम्पिक खेळाडूंच्या जॅव्हेलिन, बॅडमिंटन, हॉकी स्टिकचा समावेश

टोक्यो ऑलिम्पिक आणि त्यानंतर काही दिवसांतच झालेल्या टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत भारताचं नाव उंचीवर नेऊन ठेवलं. पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९, तर ऑलिम्पिकमध्ये ७ पदकं पटकावली. भारताचं हे आतापर्यंतचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ठरलं. या कामगिरीनंतर पंतप्रधान मोदींनी सर्व खेळाडूंची भेट घेतली होती. या भेटीत खेळाडूंनी मोदींना काही वस्तू भेट दिल्या होत्या. या वस्तूंचा आता ऑनलाईन लिलाव होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीलादेखील या वस्तू घरी आणण्याची संधी मिळणार आहे.

या वेबसाईटवर होणार लिलाव

केंद्र सरकारच्या वतीने pmmementos.gov.in/ या वेबसाईटवर लिलाव होणार आहे. त्यात नागरिकांना सहभाग घेता येईल. या लिलावात भवानी देवीच्या तलवारीपासून ते सुहास यांच्या बॅडमिंटन रॅकेटपर्यंत अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. १७ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ही लिलाव प्रक्रिया ७ ऑक्टोबरपर्यंत कायम राहील. लिलावात सहभाग घेण्यासाठी www.pmmementos.gov.in या वेबसाईटवर लॉगईन करावे लागले. या लिलावातून मिळणारी सर्व पैसे हे नमामी गंगे परियोजनेसाठी दान केली जाणार आहे.

First Published on: September 24, 2021 10:25 PM
Exit mobile version