पंतप्रधान मोदींचा आज तीन शहरात व्हॅक्सिन दौरा

पंतप्रधान मोदींचा आज तीन शहरात व्हॅक्सिन दौरा

PM Wifi योजना: देशात उघडणार १ कोटी डेटा सेंटर

पंतप्रधान मोदींचा आज तीन शहरात व्हॅक्सिन दौरा करणार आहेत. ज्यात अहमदाबाद,हैद्राबाद आणि पुणे या तीन शहरांचा समावेश आहे.  मोदी आज पुण्यातील सीरम इंस्टीट्यूला भेट देणार आहेत. कोरोना लसीची निर्मिती प्रक्रिया आणि त्यासंबंधी कामाची पाहणी करणार आहेत. कोरोना लस निर्मिती प्रक्रिया आणि त्याची पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर ते आज अहमदाबादमधील जायडस कॅडिला पार्कला भेट देणार असून त्यानंतर हैदराबादमधील भारत बायोटेक आणि त्यानंतर पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटला भेट देणार आहेत. या संबंधी पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी सकाळी ९:३० वाजता अहमदाबादला पोहचणार आहेत. त्यानंतर दुपारी १२:३० पर्यंत पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटचा दौर करणार आहेत. पुण्यानंतर ते हैद्राबादचा दौर करणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ डिसेंबरला १०० देशांचे राजदूतही पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूटला भेट देणार आहेत. सीरम इंस्टीट्यूला भेट देऊन तिथली कोरोना लसीची प्रक्रिया समजून घेणार आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूटकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. मोदी यांनी सीरम इंस्टीट्यूटला भेट दिल्यानंतर पुढे काय होणार याकडे देशाचे लक्ष लागून आहे.

First Published on: November 28, 2020 9:30 AM
Exit mobile version