‘PMC घोटाळ्या प्रकरणी आणखी एक शिवसेनेचा माजी खासदार ED च्या रडारवर’

‘PMC घोटाळ्या प्रकरणी आणखी एक शिवसेनेचा माजी खासदार ED च्या रडारवर’

PMC घोटाळ्या प्रकरणी आणखी एक शिवसेनेचा माजी खासदार ED च्या रडारवर

पीएमसी बँकेतील घोटाळ्याशी संबंधित शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी प्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. या याप्रकरणी त्यांना ५ जानेवारी रोजी चौकशी करता बोलावण्यात आले होते. मात्र, त्या ४ जानेवारी रोजी ईडी कार्यालयात हजर झाल्या. दरम्यान, त्यांच्या चौकशीतून आणखी एका शिवसेना नेत्याचे नाव समोर आले. ते देखील PMC बँकेच्या घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचा दावा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

‘शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या चौकशी दरम्यान एका नेत्याचे नाव समोर आले आहे. हा नेता शिवसेनेचा माजी खासदार असून तो पीएमसी घोटाळ्यात लाभार्थी ठरलेला आहे. त्यामुळे आता त्या नेत्यासह त्याच्या कुटुंबाचीही चौकशी व्हायला हवी’, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळं आता या नेत्याची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

काय आहे हे प्रकरण?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएमसी बँकेतील घोटाळ्याला हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) ही कंपनी जबाबदार आहे. गुरुआशीष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही एचडीआयएलची उप कंपनी आहे. प्रवीण राऊत याच कंपनीत संचालक होते. संचालक असताना त्यांनी एचडीआयएलच्या खात्यातून १.६० कोटी रुपये पत्नी माधुरी यांच्या खात्यात वळवले. माधुरी यांनी याच १.६० कोटी रुपयांपैकी ५५ लाख रुपये वर्षा राऊत यांना व्याजमुक्त कर्ज म्हणून दिले. त्या रक्कमेतून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केला. या सर्व घडामोडी २०१०-११ दरम्यान घडल्या. पुढे एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ६ हजार ६७० कोटी रुपयांचे कर्ज बुडवले. त्यातून पीएमसी बँक कोसळली. याचाच तपास ईडीकडून केला जात आहे. वर्षा राऊत यांची या प्रकरणी सोमवारी चार तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली.


हेही वाचा – २०२० ठरले गेल्या १२१ वर्षातले उकाड्याचे वर्ष – IMD


First Published on: January 5, 2021 10:27 AM
Exit mobile version