पोहे, गूळ, पीठासह दही, लस्सी सोमवारपासून महागणार

पोहे, गूळ, पीठासह दही, लस्सी सोमवारपासून महागणार

नाशिक : वाढत्या महागाईच्या आगीत सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा झटका बसणार आहे. कारण, १८ जुलैपासून आता नागरिकांना अनेक दैनंदिन वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे गूळ, पोहे, दही, लस्सी, मध यांसह ब्रॅण्डेड आणि पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.

गॅस दरवाढीपाठोपाठ आता वीज दरातही वाढ करण्यात आली आहे. मात्र, जीएसटी कौन्सिलने नॉन ब्रॅण्डेड जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय प्रस्तावित केला होता. सोमवारपासून हा निर्णय अंमलात आणण्यात येणार आहे. या निर्णयाविरोधात व्यापार्‍यांनी १६ जुलै रोजी बंद पुकारला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून निर्णय मागे घेण्याबाबत ठोस भूमिका न घेतल्यास वितरकांना १८ जुलैपासून 5 टक्के जीएसटी आकारून व्यवहार होतील. त्याचा परिणाम नॉन ब्रॅण्डेड वस्तुंच्या किंमती वाढण्यात होईल, असे व्यापारी नेत्यांनी स्पष्ट केले.

या वस्तू महागणार

टेट्रा पॅक दही, लस्सी, बटर मिल्क, गव्हाचे पीठ, पापड, मध, मांस, कुरमुरे, ब्लेड, कात्री, पेन्सिल, शार्पनर, चमच्यांवर १२ टक्के जीएसटी एलईडी १८ टक्के जीएसटी नॉन आयसीयू खोल्यांवर ५ टक्के जीएसटी चेकबुकवर घेतल्या जाणार्‍या शुल्कावर १८ टक्के कर

या वस्तू होणार स्वस्त

रोप-वे वरून प्रवासी वाहतूकीवर १८ टक्केवरून ५ टकके जीएसटी, फ्रॅक्चर उपकरणे, बॉडी प्रोस्थेसिस, बॉडी इम्प्लांटस, इंट्रा ऑक्युलर लेन्सेसवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के संरक्षण दलासाठी आयात केलेल्या वस्तूंवर आयजीएसटी लागू होणार नाही.

 

गूळ, पोहे यांसारख्या वस्तू उत्पादकांनी वितरकांना सोमवार (दि. 18) 5 टक्के जीएसटी आकारूनच व्यवहार होतील, असे कळविले आहे. यामुळे ग्राहकांवर आर्थिक भार वाढणार आहे. : प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना

 

हेही महागले

12 टक्के जीएसटी दराच्या स्लॅबमध्ये हॉटेल खोल्या (प्रति रात्र 1,000 रुपयांपेक्षा कमी दरासह) आणि रुग्णालयाच्या खोल्या (दररोज 5,000 रुपयांपेक्षा जास्त दरासह) 18 जुलैपासून नवीन दर लागू होतील. याशिवाय निवडक भांड्यांवर जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.

First Published on: July 15, 2022 1:24 PM
Exit mobile version