Gokulashtami: धक्कादायक! उपवासाच्या भगरीतून शंभर लोकांना विषबाधा

Gokulashtami: धक्कादायक! उपवासाच्या भगरीतून शंभर लोकांना विषबाधा

सर्वत्र गोकुळाष्टमी उत्सवाचा आनंद होत असताना गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे एक दुर्दैवी प्रकार घडला आहे. गोकुळाष्टमीला उपवासाची भगर खाल्याने तब्बल १०० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे घडली आहे. त्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधितांना उलटी, मळमळ होऊ लागल्याने गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही रुग्णांना बीड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी यांनी तळणेवाडी येथे भेट घेऊन ज्यांना त्रास होत आहे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून विषबाधा झालेल्या रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील धोंडराई पासून जवळच असलेल्या तळणेवाडी येथील नागरिकांनी गोकुळाष्टमी उपवासानिमित्त गावातीलच एका किराणा दुकानातून भगर खरेदी केली होती. भगरीचा भात खाल्ल्यानंतर महिला, ग्रामस्थांना मळमळ, उलटी, जुलाब आदी त्रास जाणवू लागला. संध्याकाळी चार नंतर गावातील जवळपास शंभरहून अधिक जणांना अधिकच त्रास जाणवू लागल्याने सगळ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्रास जाणवू लागलेल्या महिला, ग्रामस्थांना वाहनाद्वारे गेवराई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सरकारने या प्रकणात लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींना शिक्षा करावी अशी मागणी होत आहे. भगरीचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे, या घटनेनंतर अनेक प्रश्न आता उपस्थितीत केले जात आहे.


येवल्यातील डोंगरगावात काळवीटाची हत्या; आंतरराष्ट्रीय टोळीची शक्यता, एक ताब्यात  

First Published on: August 11, 2020 10:26 PM
Exit mobile version