औरंगाबादमधील बहिण – भावाच्या हत्येचा उलगडा; चुलत भावानेच केली हत्या

औरंगाबादमधील बहिण – भावाच्या हत्येचा उलगडा; चुलत भावानेच केली हत्या

औरंगाबादमधील बहिण - भावाच्या हत्येचा उलगडा

औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एमआयटीसमोरील एका बंगल्यात या दोघांची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले होते. धक्कादायकबाब म्हणजे या घटनेत नातेवाईकांनीच या दोघांचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. चुलत भावाने आपल्या भाऊजीच्या मदतीने ही हत्या केल्याचे समोर आले आहे. घरातील दीड किलो सोन्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

नेमके काय प्रकरण?

औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एमआयटीसमोरील एका बंगल्यात लालचंद खंदाडे हे कुटुंब भाड्याने राहत होते. मात्र, शेतीच्या कामासाठी लालचंद आपल्या पत्नीला आणि एका मुलीला घेऊन जालना येथे गेले होते. त्यामुळे घरात त्यांची मुलगी किरण आणि तिचा भाऊ सौरभ हे दोघेच होते. रात्री ८ च्या सुमारास लालचंद राजपूत घरी परतले. मात्र, वाहनाचा हार्न वाजवूनही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी वाहन उभे करून घरात पाहिले तर बाथरूममध्ये बहीण-भावाचे मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटना उघडकीस आली. या घटनेत १६ वर्षाचा सौरभ खंदाडे दहावीत तर १८ वर्षाची किरण खंदाडे बीए प्रथम वर्गात शिकत होती.

या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी २४ तासांच्या आत या घटनेचा तपास केला आहे. याप्रकरणी आरोपींना पकडले असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.


हेही वाचा – धक्कादायक! औरंगाबादमध्ये बहिण – भावाची हत्या; दीड किलो सोने लंपास


 

First Published on: June 11, 2020 12:31 PM
Exit mobile version